सुधीर गाडगीळ यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:25 IST2021-04-06T04:25:43+5:302021-04-06T04:25:43+5:30
सांगली : अन्नदान, फळवाटप, नेत्रतपासणी, मिठाईवाटप अशा विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून आमदार सुधीर गाडगीळ यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. ...

सुधीर गाडगीळ यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
सांगली : अन्नदान, फळवाटप, नेत्रतपासणी, मिठाईवाटप अशा विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून आमदार सुधीर गाडगीळ यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
सुधीरदादा गाडगीळ युवा मंचचे विश्वजित पाटील व भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या वतीने उपक्रम राबविण्यात आले. वाढदिवसानिमित्त दूरध्वनीवरून, सोशल मीडिया व अन्य माध्यमातून आ.गाडगीळ यांना शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त कुपवाड येथील वृद्धसेवाश्रमात एक वेळचे जेवण देण्यात आले. यावेळी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, दीपक माने, दरिबा बंडगर, चेतन माडगूळकर, कृष्णा राठोड, बंडू सरगर, रवींद्र ढगे, समीर भोसले, भास्कर धामापूरकर, रोहित पडणे, बापू परमने, जगन्नाथ साळुंखे आदी उपस्थित होते.
गणपती साळुंखे यांच्या वतीने वेलणकर बालकाश्रमात भोजन देण्यात आले. यावेळी उद्योजक सुहास बाबर, अनिकेत पवार, वैभव कोळी, आबा जाधव, सारंग साळुंखे उपस्थित होते. बुधगाव, कुपवाड, तसेच खणभाग व विनायकनगर येथे युवामंच व इफिगो आय केअर यांच्यावतीने ३५० नागरिकांची मोफत नेत्रतपासणी करण्यात आली. दीपक शिंदे, अमर पडळकर, सुजीत राऊत, बाळासाहेब पाटील, विक्रम पाटील, जयवंत पाटील, मंदार भाकरे आदी उपस्थित होते. ५० टक्के सवलतीत चष्म्यांचे वाटप करण्यात येणार आहे.
ओबीसी युवा मोर्चाच्या वतीने सांगलीत जिलेबी वाटप झाले. त्यावेळी अध्यक्ष राहुल माने, संगीता जाधव, शुभम माने, संदीप जाधव, सुनीता भोसले, प्रथमेश वैद्य, सोहम जोशी उपस्थित होते. मिरजेतील माहेर अनाथाश्रम येथे महिला मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्या ज्योती कांबळे यांच्या हस्ते अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. यावेळी जयगोंड कोरे, माधुरी वसगडेकर उपस्थित होते. सांगलीच्या वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात फळवाटप करण्यात आले. यावेळी अशरफ वांकर, शाहनवाज सौदागर, साजिद अली पठाण, कय्युम शेख, असगर शरिकमसलत, फिरोज मुलाणी, राजू मद्रासी, संजय मोरे, इम्रान पठाण, रियाज वंटमोरे, नितीन शिंदे, सुनील आवळे, संदीप झेंडे उपस्थित होते. नगरसेवक प्रकाश ढंग, दरिबा बंडगर, सुजीत राऊत, राहुल माने यांच्या वतीने भगिनी निविदिता वसतिगृहातील विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यशवंतनगर, लक्ष्मीनगर, माळी वस्ती येथे मराठा ग्रुपने मुक्या-भटक्या जनावरांसाठी व पशुपक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली. यावेळी विश्वजीत पाटील, समीर भोसले, अनिकेत सूर्यवंशी, भास्कर धामापूरकर आदी उपस्थित होते.