शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

टेंभू योजनेच्या चौथ्या टप्प्याची यशस्वी चाचणी : बळीराजा सुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 00:33 IST

खानापूर तालुक्यातील दुष्काळी देवीखिंडी, लेंगरे परिसराला वरदान ठरणाऱ्या महत्त्वाकांक्षी टेंभू जलसिंचन योजनेच्या चौथ्या टप्प्याची चाचणी गुरूवारी यशस्वी झाली. चौथ्या टप्प्यातील विद्युत पंपाद्वारे कृष्णेचे पाणी कालव्यातून लेंगरे तलावाकडे प्रवास करू लागताच

ठळक मुद्देदुष्काळी लेंगरे परिसरात जल्लोष; शेतकरी, लोकप्रतिनिधींच्या लढ्याला अखेर यशगुरूवारी आ. बाबर व उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्या उपस्थितीत चौथ्या टप्प्याची चाचणी घेण्यात आली.

विटा : खानापूर तालुक्यातील दुष्काळी देवीखिंडी, लेंगरे परिसराला वरदान ठरणाऱ्या महत्त्वाकांक्षी टेंभू जलसिंचन योजनेच्या चौथ्या टप्प्याची चाचणी गुरूवारी यशस्वी झाली. चौथ्या टप्प्यातील विद्युत पंपाद्वारे कृष्णेचे पाणी कालव्यातून लेंगरे तलावाकडे प्रवास करू लागताच शेतकºयांनी जल्लोष केला.

आमदार अनिल बाबर व जि. प. उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्यासह टेंभू अधिकाºयांच्या उपस्थितीत या चौथ्या टप्प्याची चाचणी यशस्वी झाल्याने दुष्काळी भागातील बळीराजा सुखावला आहे.

टेंभू योजनेच्या देवीखिंडी येथील चौथ्या टप्प्याचे काम अपवाद वगळता पूर्ण झाले आहे. घाणंद कालव्यातून भरण कालव्याद्वारे टेंभूचे पाणी देवीखिंडी येथील टप्पा क्र. ४ मध्ये सोडण्यात आले आहे. तेथून हे पाणी भूड येथील पाचव्या टप्प्यात जाणार आहे. यादरम्यान लेंगरे तलावात टेंभूचे पाणी सोडण्यात येणार आहे. त्यासाठी बुधवारी चौथ्या टप्प्यातील एक पंप सुरू करण्यात आला होता. परंतु, गळती असल्याने पंप बंद करून रात्री उशिरापर्यंत गळती काढण्याचे काम पूर्ण करण्यात आले.

गुरूवारी आ. बाबर व उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्या उपस्थितीत चौथ्या टप्प्याची चाचणी घेण्यात आली. ती पूर्णपणे यशस्वी झाली. त्यामुळे कृष्णामाईने लेंगरे तलावाच्या बाजूने प्रवास सुरू केला.रात्री उशिरा टेंभूचे पाणी लेंगरे तलावात दाखल होईल. टेंभूच्या चौथ्या टप्प्याची चाचणी यशस्वी झाल्याचे समजताच लेंगरे, जोंधळखिंडी, देवीखिंडी, भूड, वाळूज परिसरातील शेतकºयांनी कालव्यावर गर्दी करून जल्लोष केला.मुख्यमंत्र्यांच्याहस्ते लवकरच उद्घाटन...दुष्काळी भागात टेंभूचे पाणी आल्याने शेतकºयांच्या चेहºयावरचा आनंद हा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. टेंभू योजनेच्या चौथ्या टप्प्याची चाचणी यशस्वी झाली आहे. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते टेंभू योजनेच्या या चौथ्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे आ. अनिल बाबर यावेळी बोलताना म्हणाले. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईDamधरणSangliसांगली