‘सेवासदन’मध्ये हृदयातील कठीण शस्त्रक्रिया यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:46 IST2021-02-06T04:46:54+5:302021-02-06T04:46:54+5:30
दहा लाखांत एखाद्या रुग्णालाच हृदयात कर्करोगाचा ट्यूमर असतो. या दुर्मीळ अशा आजारावर यशस्वी शस्त्रक्रिया करून महिलेचा आजार दूर ...

‘सेवासदन’मध्ये हृदयातील कठीण शस्त्रक्रिया यशस्वी
दहा लाखांत एखाद्या रुग्णालाच हृदयात कर्करोगाचा ट्यूमर असतो. या दुर्मीळ अशा आजारावर यशस्वी शस्त्रक्रिया करून महिलेचा आजार दूर करण्यात आला. संबंधित महिलेच्या हृदयात उजव्या बाजूस मांसाची गाठ असल्याने तिला दम लागत होता. चालता येत नव्हते. वजन झपाट्याने कमी होऊन ३२ किलोंवर आले होते. तातडीची शस्त्रक्रिया न केल्यास रुग्णास धोका असल्याने महिलेचे कुटुंबीय हवालदिल होते.
डाॅ. तुषार धोपाडे यांनी भुलतज्ञ डाॅ. स्वाती पाटील व पाॅल चाको यांच्या मदतीने महिलेवर तब्बल सात तास गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून हृदयातील मांसाची गाठ व हृदयाभोवती खराब झालेले आवरण काढून टाकल्याने संबंधित महिला रुग्णाच्या सर्व तक्रारी दूर होऊन दीनचर्या पूर्ववत झाली. महिलेची गरीब परिस्थिती असल्याने डाॅ. धोपाडे यांनी रुग्णास गरज असलेली महागडी इंजेक्शन मोफत देऊन त्यांची मदत केली.