कुस्तीत महिला मल्लांचे यश प्रेरणादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:28 IST2021-09-18T04:28:33+5:302021-09-18T04:28:33+5:30
फोटो - विटा येथे खानापूर पंचायत समितीत सुवर्णपदक विजेती महिला मल्ल आरती मोहिते हिचा सभापती महावीर शिंदे यांच्या हस्ते ...

कुस्तीत महिला मल्लांचे यश प्रेरणादायी
फोटो - विटा येथे खानापूर पंचायत समितीत सुवर्णपदक विजेती महिला मल्ल आरती मोहिते हिचा सभापती महावीर शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी संतोष मोहिते, मनीषा मोहिते, नंदकुमार सकटे, ऊर्मिला शिंदे उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : महाराष्ट्राचा रांगडा खेळ म्हणून परिचित असलेल्या कुस्ती क्षेत्राला आज चांगले दिवस येऊ लागले आहेत. अस्सल लाल मातीत मुलांसह महिला मल्लही आपले कसब दाखवून यश संपादन करू लागले आहेत. त्यामुळे कुस्ती क्षेत्रातील मुलींचे यश प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन खानापूर पंचायत समितीचे सभापती महावीर शिंदे यांनी केले.
विटा येथील आदर्श कुस्ती संकुलाची महिला मल्ल आरती शंकर मोहिते या मोहित्यांचे वडगावच्या कन्येने वैराग (बार्शी) येथे झालेल्या ग्रापलिंग कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. यातून दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी तिची निवड झाली. याबद्दल तिचा विटा येथे सभापती महावीर शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या वेळी कुस्ती प्रशिक्षक अभिजित मोरे, सुनील देशपांडे, संतोष मोहिते, मनीषा मोहिते, ऊर्मिला शिंदे, नंदकुमार सकटे, माणिक फुके, हणमंत शेडगे, अरुण कांबळे, विलास धर्मे उपस्थित होते.