विद्यामंदिर नीट अ‍ॅकॅडमीचे सीईटी परीक्षेत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:06 IST2020-12-05T05:06:13+5:302020-12-05T05:06:13+5:30

इस्लामपूर : येथील विद्यामंदिर हायस्कूल-कनिष्ठ महाविद्यालय आणि विद्यामंदिर आयआय नीट अ‍ॅकॅडमीमधील विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षेत यश मिळविले. पीसीएम ग्रुपमध्ये ...

Success in Vidyamandir Neet Academy's CET exam | विद्यामंदिर नीट अ‍ॅकॅडमीचे सीईटी परीक्षेत यश

विद्यामंदिर नीट अ‍ॅकॅडमीचे सीईटी परीक्षेत यश

इस्लामपूर : येथील विद्यामंदिर हायस्कूल-कनिष्ठ महाविद्यालय आणि विद्यामंदिर आयआय नीट अ‍ॅकॅडमीमधील विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षेत यश मिळविले. पीसीएम ग्रुपमध्ये २२ विद्यार्थ्यांना ९९ टक्के गुण मिळाले, तर पीसीबी ग्रुपमध्ये १५ विद्यार्थी ९८ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले. पीसीएममध्ये किरण पाटील (९९.६०), प्रतीक पाटील (९९.५९), ओंकार पाटील (९९.४२), तर पीसीबीमध्ये लोचन लाड (९८.८३), सिद्धार्थ माळी (९८.४४) व प्रणाली मोहिते (९५.३१) यांनी गुणानुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकाविले.

संस्थेचे सचिव अ‍ॅड. बी. एस. पाटील, सहसचिव अ‍ॅड. धैर्यशील पाटील, प्राचार्य व्ही. बी. सावंत, प्राचार्य संदीप पाटील, विभागप्रमुख शशिकांत पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

फोटो ०३१२२०२०-विद्यामंदिर न्यूज

Web Title: Success in Vidyamandir Neet Academy's CET exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.