उंटवाडी स्थानिक आघाडीला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:11 IST2021-01-24T04:11:51+5:302021-01-24T04:11:51+5:30

माडग्याळ : उंटवाडी (ता. जत) येथे स्थानिक आघाडीला सातपैकी सहा जागा मिळाल्याने सत्तांतर झाले. या ग्रामपंचायतीवर अनेक वर्षे ...

Success to the Untwadi local front | उंटवाडी स्थानिक आघाडीला यश

उंटवाडी स्थानिक आघाडीला यश

माडग्याळ : उंटवाडी (ता. जत) येथे स्थानिक आघाडीला सातपैकी सहा जागा मिळाल्याने सत्तांतर झाले. या ग्रामपंचायतीवर अनेक वर्षे काँग्रेस पक्षाची सत्ता होती. यावेळी प्रथमच ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली होती. येथील सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन कोणत्याही परिस्थितीत सत्ताबदल करायचेच, या इराद्याने स्थानिक आघाडीची स्थापना करून प्रस्थापितांविरुद्ध निवडणूक लढविली.

या निवडणुकीत विरोधी गटाचे एकमेव उमेदवार चिठ्ठीद्वारे निवडून आला आहे. स्थानिक आघाडीच्या सातव्या उमेदवाराला व विरोधी गटातील उमेदवाराला समान मते पडल्याने दोघांच्या नावे चिठ्ठी टाकण्यात आली, त्यात विरोधी गटातील उमेदवाराचा विजय झाला.

विजयी उमेदवारांमध्ये लिंबेव्वा खोत, खंडू खडतरे, मानसी सुतार, राहुल पवार, लक्ष्मी तुळजानवर, विलास बजंत्री यांचा समावेश आहे.

उंटवाडी येथे विकास सोसायटी व ग्रामपंचायतीची सत्ता आता एकाच गटाकडे आल्याने विकासकामाला गती येऊन प्रगती साधता येईल, असा विश्वास सोसायटीचे अध्यक्ष डॉ. ए. पी. तुळजानवर यांनी व्यक्त केला.

Web Title: Success to the Untwadi local front