येलूर येथील खेळाडूंचे जिल्हांतर्गत मैदानी स्पर्धेत यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:23 IST2021-02-08T04:23:37+5:302021-02-08T04:23:37+5:30
येलूर : सांगली येथे झालेल्या जिल्हाअंतर्गत मैदानी स्पर्धेत येलुर (ता. वाळवा) येथे वनश्री नानासाहेब महाडिक स्पोर्टस् फाउंडेशनच्या खेळाडूंनी यश ...

येलूर येथील खेळाडूंचे जिल्हांतर्गत मैदानी स्पर्धेत यश
येलूर : सांगली येथे झालेल्या जिल्हाअंतर्गत मैदानी स्पर्धेत येलुर (ता. वाळवा) येथे वनश्री नानासाहेब महाडिक स्पोर्टस् फाउंडेशनच्या खेळाडूंनी यश संपादन केले. यानिमित्त भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल महाडिक यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
राहुल महाडिक म्हणाले, विविध खेळांचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळावे तसेच खेळाडूंना राष्ट्रीय स्तरापर्यंत नाव कमावता यावे या दृष्टिकोनातून वनश्री स्पोर्ट्स विविध सुविधांसह कार्यरत आहे. खेळाडूंनी मिळवलेले यश उल्लेखनीय असून यापुढेही स्पोर्टस् फाउंडेशन त्यांच्या पाठीशी नक्कीच असणार आहे.
श्रावणी ठोंबरे हिने १०० मीटर व २०० मीटर प्रथम क्रमांक, रुतुजा ठिक लांब उडी द्वितीय क्रमांक, प्रथमेश कुंभार भालाफेक प्रथम क्रमांक मिळविला. फाउंडेशनचे क्रीडा प्रशिक्षक गजानन सुतार यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी आदर्श युवा क्रीडारत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य निजाम मुलाणी, जी. व्ही. गायकवाड, उपसरपंच बाळासाहेब जाधव, विजय पाटील, पै. बबन शिंदे, शंकर ठिक, शशिकांत कुंभार, सुदर्शन जाधव, विशाल महाडीक, दत्ताजी गायकवाड, गजानन सुतार आदी उपस्थित होते.
फोटो - ०७०२२०२१-आयएसएलएम-येलूर न्यूज
जिल्हाअंतर्गत मैदानी स्पर्धेत येलूर (ता. वाळवा) येथे वनश्री नानासाहेब महाडिक स्पोर्टस् फाउंडेशन, येलूरमधील खेळाडूंनी यश मिळविले आहे. त्यांचा भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल महाडिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.