राज्य योगासन स्पर्धेत मिरजेतील खेळाडूंचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:26 IST2021-04-01T04:26:51+5:302021-04-01T04:26:51+5:30
मिरज : डेरवण (जि. रत्नागिरी) येथे आयाेजित राज्य योगासन स्पर्धेत मिरजेतील केळकर स्मृती योग वर्गाच्या योगपटूंनी यश मिळवले. ...

राज्य योगासन स्पर्धेत मिरजेतील खेळाडूंचे यश
मिरज : डेरवण (जि. रत्नागिरी) येथे आयाेजित राज्य योगासन स्पर्धेत मिरजेतील केळकर स्मृती योग वर्गाच्या योगपटूंनी यश मिळवले. या स्पर्धेत राज्यातील अडीचशे खेळाडू सहभागी झाले होते. बारा वर्षाखालील गटात संस्थेच्या सर्वेश पाठक याने प्रथम, राजवर्धन मोरे याने द्वितीय व अर्जुन गिरीश पुजारी याने तृतीय क्रमांक मिळवला. चौदा वर्षाखालील गटात मुलींच्या विभागात सांगलीच्या मृण्मयी कुलकर्णीने तृतीय व दहा वर्षे वयोगटात सई पाटीलने द्वितीय क्रमांक मिळवला. शीर्षासन, पद्म शीर्षासन, चक्रबंधासन, सर्वांगासन, चक्रासन अशी अनेक चित्तथरारक योगासने या योगपटूंनी सादर केली.
‘मुंबई महापौर चषक’ स्पर्धेत ६ ते ८ या वयोगटात श्रेयावंश सावंत याने तिसरा, राजवर्धन मोरे याने चौथा व ६० वर्षाखालील वयोगटात अंजली केळकर यांनी प्रथम क्रमांक मिळवला. या खेळाडूंना योगशिक्षक अंजली केळकर, दीपक दुर्गाडे, आशिष माळी, कुणाल शिंदे, मयुरी धुमाळ, डाॅ. मुकुंदराव पाठक यांनी मार्गदर्शन केले.