पलूस तालुक्यात महाविकास आघाडीला यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:28 IST2021-01-19T04:28:18+5:302021-01-19T04:28:18+5:30
धनगाव आणि दह्यारी ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाले. उर्वरित ठिकाणी संमिश्र निकाल आले आहेत. आंधळीत काँग्रेसकडे आठ, तर राष्ट्रावादी-भाजपकडे तीन, मोराळेत ...

पलूस तालुक्यात महाविकास आघाडीला यश
धनगाव आणि दह्यारी ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाले. उर्वरित ठिकाणी संमिश्र निकाल आले आहेत.
आंधळीत काँग्रेसकडे आठ, तर राष्ट्रावादी-भाजपकडे तीन, मोराळेत काँग्रेसला सर्व नऊ जागा मिळाल्या. तुपारीत काँग्रेस- राष्ट्रवादीकडे आठ, तर भाजपला एक, दह्यारीत सत्तांतर होऊन काँग्रेस-राष्ट्रवादीला चार, तर भाजप आघाडीला तीन, रामानंदनगरमध्ये काँग्रेसला नऊ, तर भाजप आघाडीला आठ, नागराळे येथे स्थानिक आघाडीला नऊ, तर राष्ट्रवादी-भाजपला पाच, बुरुंगवडीत महाविकास आघाडी आठ, तर काँग्रेस व इतर एक, धनगावमध्ये सत्तांतर होऊन काँग्रेस-राष्ट्रवादी सहा, स्थानिक आघाडी तीन, माळवाडीत सत्तांतर होऊन राष्ट्रवादी-काँग्रेसला १३, तर भाजपला दोन, नागठाणेत काँग्रेस-राष्ट्रवादीला नऊ, भाजपला पाच व अपक्ष एक, भिलवडीत सत्तांतर होऊन काँग्रेसला १३, तर भाजप-राष्ट्रवादीला चार जागा मिळविण्यात यश आले.
चाैकट
कार्यर्त्यांचा जल्लोष
पलूस येथील मध्यवर्ती शासकीय इमारतीजवळ कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. जसजसे निकाल मिळतील तसतसे जल्लोषाचे वातावरण तयार होत होते. यावेळी पोलीस यंत्रणेने चोख बंदोबस्त ठेवला होता.