ड्रॉप रो बॉल स्पर्धेत ‘गुरुकुल’चे यश

By Admin | Updated: January 14, 2015 23:20 IST2015-01-14T22:21:44+5:302015-01-14T23:20:48+5:30

महाराष्ट्र ड्रॉप रो बॉल असोसिएशनतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते़

The success of 'Gurukul' in the Drop-Roy Ball tournament | ड्रॉप रो बॉल स्पर्धेत ‘गुरुकुल’चे यश

ड्रॉप रो बॉल स्पर्धेत ‘गुरुकुल’चे यश

सांगली : भोईसर (जि़ पालघर) येथे झालेल्या राज्यस्तरीय ड्रॉप रो बॉल स्पर्धेत बांबवडे (ता़ पलूस) येथील आविष्कार गुरूकुल शाळेच्या दहा खेळाडूंनी यश संपादन केले़ महाराष्ट्र ड्रॉप रो बॉल असोसिएशनतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते़ गुरूकुल आविष्कार शाळेच्या पाच मुलांनी सबज्युनिअर व पाच मुलांनी ज्युनिअर गटात वेगवान खेळ करून यश मिळविले़
यशस्वी खेळाडू असे : १४ वर्षाखालील : डबल : विश्वजित पाटील व निरंजन जाधव (प्रथम), ट्रीपल : सुदर्शन जाधव, राहुल साळुंखे व साहील पाटील (तृतीय)़ १६ वर्षाखालील : डबल : कुणाल रावळ व शेखर शेटे (तृतीय). ट्रीपल : सागर सुतार, रोहित शिंदे व विशाल ककमरे (तृतीय)़ सर्व यशस्वी खेळाडूंना ‘गुरूकुल’चे संस्थापक जितेंद्र संकपाळ, सचिव अनुराधा संकपाळ, मुख्याध्यापक जयसिंग सुतार, पर्यवेक्षक सुधीर अदाटे व क्रीडाशिक्षक नामदेव शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले़ (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: The success of 'Gurukul' in the Drop-Roy Ball tournament