जनतेच्या पाठबळामुळेच कोरोना मुक्तीच्या लढ्यास यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:32 IST2021-08-25T04:32:21+5:302021-08-25T04:32:21+5:30
कसबे डिग्रज : ग्रामीण भागातील जनतेच्या पाठबळामुळेच कोरोनामुक्तीच्या लढ्याला खऱ्या अर्थाने यश प्राप्त झाले आहे. विशेषत: समडोळी गावाने या ...

जनतेच्या पाठबळामुळेच कोरोना मुक्तीच्या लढ्यास यश
कसबे डिग्रज : ग्रामीण भागातील जनतेच्या पाठबळामुळेच कोरोनामुक्तीच्या लढ्याला खऱ्या अर्थाने यश प्राप्त झाले आहे. विशेषत: समडोळी गावाने या लढ्यासाठी उचललेला वाटा कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक वीरकर यांनी केले.
समडोळी (ता. मिरज) येथे नंदनवन फाऊंडेशनच्या माध्यमातून व स्थानिक युवावर्गाच्या सहकार्यातून कोरोना योद्ध्यांचा गौरव समारंभप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अशोक वीरकर बोलत होते.
वीरकर यांच्या हस्ते कोरोनाकाळात काम केलेल्या डॉ. राहुल रुगे, डॉ. दीपाली रुगे, डॉ. के. के. कुरकुटे, आरोग्य सेविका सुजाता पवार, आशा मस्के आदींचा स्मृतिचिन्ह, प्रशस्तिपत्र, फेटा बांधून गौरव करण्यात आला. एस. बी. ढोले यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी सचिन रूगे, रवी कदम, राजकुमार ढोले, सुकुमार वांजळे, अभिजित माने आदी उपस्थित होते. प्रतीक्षा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सुजाता पवार यांनी आभार मानले.