विद्यानिकेतन प्रवेशपूर्व परीक्षेत आश्रमशाळेचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:22 IST2020-12-09T04:22:10+5:302020-12-09T04:22:10+5:30

आष्टा : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यावतीने फेब्रुवारी २०२० मध्ये घेण्यात आलेल्या विद्यानिकेतन प्रवेशपूर्व परीक्षेत संत ज्ञानेश्वर शिक्षण ...

Success of Ashram School in Vidyaniketan Pre-Entrance Examination | विद्यानिकेतन प्रवेशपूर्व परीक्षेत आश्रमशाळेचे यश

विद्यानिकेतन प्रवेशपूर्व परीक्षेत आश्रमशाळेचे यश

आष्टा : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यावतीने फेब्रुवारी २०२० मध्ये घेण्यात आलेल्या विद्यानिकेतन प्रवेशपूर्व परीक्षेत संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या प्राथमिक, माध्यमिक आश्रमशाळा, रेठरेधरण, तासगाव व आष्टाच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.

सूरज राठोड, विकास माने, विश्वजित मोकाशी, काजल घुटुकडे, ओमकार करडे यांची महाराष्ट्र शासन समाजकल्याण विभाग मान्यताप्राप्त विमुक्त जाती सेवा समिती यांच्यावतीने विमुक्त जाती व भटक्या जमातीतील विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांसाठी सुरु असलेल्या विद्यानिकेतन पब्लिक स्कूलमध्ये निवड झाली. या परीक्षेमधून विद्यार्थ्यांची सहावीमध्ये निवड केली जाते.

विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष अण्णासाहेब डांगे, उपाध्यक्ष अ‍ॅड. संपतराव पाटील, सचिव राजेंद्र डांगे, खजिनदार विठ्ठलराव मुसाई, सत्तू ढोले, सुकुमार लवटे, संस्थेचे कार्यकारी संचालक आर. ए. कनाई, व्यवस्थापक सुनील शिनगारे यांचे प्राेत्साहन, तर मुख्याध्यापक रघुनाथ बोते, सदाशिव तंनगी, शिवाजी पाटील व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Success of Ashram School in Vidyaniketan Pre-Entrance Examination