शिराळ्यात नगराध्यक्षपदासाठी दाेन अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:23 IST2020-12-08T04:23:39+5:302020-12-08T04:23:39+5:30

शिराळा : शिराळा नगरपंचायत नगराध्यक्ष पदाच्या अर्ज दाखल करण्याच्यादिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने बांधकाम सभापती सुनीता निकम व प्रतिभा पवार यांनी ...

Submission of application for the post of Mayor in Shirala | शिराळ्यात नगराध्यक्षपदासाठी दाेन अर्ज दाखल

शिराळ्यात नगराध्यक्षपदासाठी दाेन अर्ज दाखल

शिराळा : शिराळा नगरपंचायत नगराध्यक्ष पदाच्या अर्ज दाखल करण्याच्यादिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने बांधकाम सभापती सुनीता निकम व प्रतिभा पवार यांनी अर्ज दाखल केले असून, छाननीत दोन्ही अर्ज वैध ठरले आहेत.

सहायक निवडणूक अधिकारी मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्याकडे दोन्ही उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यावेळी माजी नगराध्यक्षा अर्चना शेटे, गौतम पोटे, माजी उपनगराध्यक्ष कीर्तीकुमार पाटील, विजय दळवी, संजय हिरवडेकर, आशाताई कांबळे, बंटी पाटील आदी उपस्थित होते. दुपारी २ नंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी नागेश पाटील यांच्या उपस्थितीत छाननी झाली. यामध्ये दोन्ही अर्ज वैध ठरविण्यात आले. या नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असून, गुरुवार, दि. १० रोजी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. शुक्रवार, दि. ११ रोजी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठी निवड होणार आहे. या दोन्ही पदांसाठी कोणाची वर्णी लागते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

फोटो : ०७ शिराळा ०२

ओळ : शिराळा नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी सौ. सुनीता निकम मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्याकडे अर्ज दाखल करताना, सोबत माजी नगराध्यक्षा सौ अर्चना शेटे आदी.

Web Title: Submission of application for the post of Mayor in Shirala