सुभेदार काकासाहेब पाटील यांचा तुजारपुरात सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:32 IST2021-09-09T04:32:01+5:302021-09-09T04:32:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : तुजारपूर (ता. वाळवा) येथील सुभेदार काकासाहेब भगवान पाटील भारतीय सेनेतून ज्युनियर कमिशन ऑफिसर म्हणून ...

Subhedar Kakasaheb Patil felicitated at Tujarpur | सुभेदार काकासाहेब पाटील यांचा तुजारपुरात सत्कार

सुभेदार काकासाहेब पाटील यांचा तुजारपुरात सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : तुजारपूर (ता. वाळवा) येथील सुभेदार काकासाहेब भगवान पाटील भारतीय सेनेतून ज्युनियर कमिशन ऑफिसर म्हणून तीस वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झाले. त्यांनी कारगिल, मणिपूर, नागालँड, जम्मू- काश्मीर, पुंछ, लेह-लडाख, राजस्थान तसेच शांती सेनेमध्ये शौर्य गाजवून नावलौकिक वाढवला आहे. त्यांचा आदर्श नव्या पिढीला प्रेरणादायी ठरेल, असे गौरवोद्गार सुरेंद्र पाटील यांनी काढले.

काकासाहेब पाटील यांनी अतिसंवेदनशील भागामध्ये दाखवलेल्या साहसाबद्दल त्यांचा शौर्य पदक व मानपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे. मराठमोळा युवक मंडळाचे अध्यक्ष सुरेंद्र पाटील यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दिनकर पाटील, सोपान पाटील, रामचंद्र पाटील, साईशाम जाधव, उद्धव पाटील उपस्थित होते. सतीश पाटील यांनी प्रास्ताविक केले. अतुल पाटील यांनी आभार मानले.

Web Title: Subhedar Kakasaheb Patil felicitated at Tujarpur