वैद्यकीय उपचारांसाठी विद्यार्थ्यांना मिळणार ५० हजार रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:27 IST2021-04-02T04:27:00+5:302021-04-02T04:27:00+5:30
सांगली : शिवाजी विद्यापीठाशी संलग्न विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना आजारपण किंवा अपघातप्रसंगी वैद्यकीय उपचारांसाठी ५० हजार रुपयांपर्यंतचा खर्च विद्यापीठाकडून मिळणार ...

वैद्यकीय उपचारांसाठी विद्यार्थ्यांना मिळणार ५० हजार रुपये
सांगली : शिवाजी विद्यापीठाशी संलग्न विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना आजारपण किंवा अपघातप्रसंगी वैद्यकीय उपचारांसाठी ५० हजार रुपयांपर्यंतचा खर्च विद्यापीठाकडून मिळणार आहे. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडून वर्षाकाठी २० रुपये अपघात निधी शुल्क घेतले जाणार आहे. विद्यापीठाच्या अधिसभेत सदस्य श्रीनिवास गायकवाड यांनी तशी सूचना केली होती.
सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांतील दोन लाख विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळेल. गायकवाड यांनी सांगितले की, २-१८ मध्ये अधीसभेत तसा ठराव मंजूर झाला होता. विद्यापीठाच्या यंदाच्या अर्थसंकल्पात त्यासाठी दहा लाखांची तरतूद करण्यात आली. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होईल. विद्यापीठाची दूरशिक्षण केंद्रे तसेच विद्यापीठाच्या अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनाही लाभ मिळेल. यासाठी विद्यापीठाने समिती स्थापन करून योजनेचा मसुदा तयार केला आहे. खेळाडू, एनसीसी कॅडेट्स व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना योजनेचा विशेष फायदा होणार आहे.