शॉर्ट कोर्सेसकडे विद्यार्थ्यांचा कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:27 IST2021-09-19T04:27:46+5:302021-09-19T04:27:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : कोरोना महामारीने उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणत मंदी आली आहे. याचा परिणाम रोजगारावर झाला आहे. ...

Students' tendency towards short courses | शॉर्ट कोर्सेसकडे विद्यार्थ्यांचा कल

शॉर्ट कोर्सेसकडे विद्यार्थ्यांचा कल

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : कोरोना महामारीने उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणत मंदी आली आहे. याचा परिणाम रोजगारावर झाला आहे. त्यामुळे नीट व जेईईसारख्या परीक्षा देऊन शिक्षण घेणे पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे आता अल्प फी असलेल्या शॉर्ट कोर्सेसकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे.

तारांकित शहरामध्ये असलेल्या आय टी क्षेत्रात कमालीचे मंदीचे सावट आहे. कोरोनामुळे काही कामगारांवर बेकरीचे संकट आले आहे; तर काहींना अल्प पगारामध्ये नोकरी करावी लागत आहे. त्यामुळेच अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्यांची संख्या रोडावली आहे; तर डिप्लोमा किंवा आयटीआयला प्रवेश घेऊन एक-दोन वर्षाचे शॉर्ट कोर्सेस पूर्ण करणाऱ्या विद्या ऱ्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे बऱ्याच शिक्षण संस्था कौशल्य आधारित असणाऱ्या कोर्सेसला शासनाची मान्यता मिळवण्यासाठी मंत्रालयात खेटे घालत आहेत.

कोरोना महामारीमुळे वैद्यकीय क्षेत्राला महत्त्व आले आहे. त्यामुळे शस्त्र विभागाकडे प्रथम प्रवेश घेण्याकडे विद्यार्थी प्राधान्य देत आहेत; परंतु नीट आणि सीईटी परीक्षा तयारीसाठी पालकांना लाखो रुपयांची फी मोजावी लागत आहे. तर एमबीबीएस, बीएएमएम, दंत शिक्षण आदी क्षेत्रात प्रवेश हवे असतील तर पालकांना कोटीच्या घरात शिक्षण खर्चाची तजवीज करावी लागते. राज्यात शासकीय महाविद्यालयाची संख्या पाहता विद्यार्थ्यांना खासगी शिक्षण संस्थेत प्रवेश घ्यावा लागतो; परंतु तेथील असलेली भरमसाट फी पालकांना शक्य नसल्याने बरेच विद्यार्थी आता कमी कालावधी असलेल्या शॉर्ट कोर्सकडे वळू लागले आहेत.

कोट

कौशल्य आधारित शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा ओढा आहे. कमी काळात कौशल्य आत्मसात करून रोजगार किंवा उद्योगातल्या संधी शोधण्याकडे कल वाढला आहे.

- ॲड. धैर्यशील पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर

Web Title: Students' tendency towards short courses