विद्यार्थ्यांनी अपयशाने खचून न जाता प्रयत्न करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:24 IST2021-02-07T04:24:21+5:302021-02-07T04:24:21+5:30

उमदी (ता. जत) येथील समता प्राथमिक, माध्यमिक व ज्युनिअर काॅलेजमध्ये शिक्षक संघातर्फे जत तालुक्यात आदर्श पुरस्काप्राप्त शिक्षक व पत्रकारांचा ...

Students should try not to get overwhelmed by failure | विद्यार्थ्यांनी अपयशाने खचून न जाता प्रयत्न करावे

विद्यार्थ्यांनी अपयशाने खचून न जाता प्रयत्न करावे

उमदी (ता. जत) येथील समता प्राथमिक, माध्यमिक व ज्युनिअर काॅलेजमध्ये शिक्षक संघातर्फे जत तालुक्यात आदर्श पुरस्काप्राप्त शिक्षक व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर्वोदय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष रेवाप्पाण्णा लोणी होते. माजी मुख्याध्यापक एस. एन. कोळगीरी व डी. एम. हलकुडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी कै. बाबूराव दुधाळ स्मृती आदर्श शिक्षण सेवा पुरस्काराने प्राचार्य एस. के. होर्तीकर, कै.शिवदास जानकर स्मृती आदर्श पत्रकाराने पत्रकार राहुल संकपाळ, आदर्श शिक्षक म्हणून मुख्याध्यापक हणमंत वाघ, राजकुमार इम्मणवर, विद्या शिरगट्टी, पी. एस. माळी यांचा गाैरव करण्यात आला. यावेळी प्राचार्य सुभाष होर्तीकर, मुख्याध्यापक मच्छिंद्र इम्मनवर, अमर बगली, चेंत्रा होर्तीकर, प्रकाश चव्हाण, एस. एस. जोगूर, एस. एम. बिज्जरगी आदी उपस्थित होत.

फोटो-०६उमदी१

फोटो ओळ : उमदी (ता. जत) येथे आयोजित कार्यक्रमात एस. के. होर्तीकर यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: Students should try not to get overwhelmed by failure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.