खटावमध्ये पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी सरसावले विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:47 IST2021-03-13T04:47:38+5:302021-03-13T04:47:38+5:30

लिंगनूर : उन्हाचा पारा वाढत असल्याच्या काळात पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्याची कोरडी आवाहने प्रसारित होत आहेत. खटाव ...

Students rushed to quench the thirst of the birds in Khatav | खटावमध्ये पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी सरसावले विद्यार्थी

खटावमध्ये पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी सरसावले विद्यार्थी

लिंगनूर : उन्हाचा पारा वाढत असल्याच्या काळात पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्याची कोरडी आवाहने प्रसारित होत आहेत. खटाव (ता. मिरज ) येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी मात्र यापुढे एक पाऊल टाकत पक्षी व झाडांसाठी पाण्याची प्रत्यक्ष सोय केली. शाळेच्या परिसरातील झाडांवर पाण्याच्या बाटल्या अडकवून सुशोभीकरणही केले.

पाणी प्यायल्यानंतर फेकून दिलेल्या प्लास्टिक बाटल्या विद्यार्थ्यांनी या प्रकारे सत्कारणी लावल्या. शिक्षक सुनील लांडगे व सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम राबविला. उन्हाची तीव्रता वाढत असताना शाळेच्या भोवतालची वनराई वाळू लागली होती. त्यावर बसणाऱ्या पक्ष्यांचीही पाण्यासाठी तडफड सुरू होती. हे लक्षात घेऊन शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले. त्यानुसार विद्यार्थ्यांनी घरातून प्लास्टिकच्या बाटल्या आणल्या. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्या अर्ध्यातून कापून पाणी भरले. झाडांच्या फांद्यांवर त्या दोरीने अडकविल्या. यातून झाडांचे सुशोभीकरण, प्लास्टिकचा सदुपयोग आणि पक्ष्यांची तहान या तिन्ही गोष्टी साध्य झाल्या; शिवाय विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी प्रेम निर्माण करण्यात शिक्षक यशस्वी ठरले.

शिक्षक लांडगे म्हणाले की, दररोज झाडांना पाणी घालणे शक्य नसल्याने ठिबक सिंचनाचा पर्याय सुचला. त्यासाठी टाकाऊ प्लास्टिक बाटल्यांचा वापर केला. फांद्यांवर अडकवितानाही त्यामध्ये कलाकृती आकार घेईल याचे भान ठेवले. चार मुलांचा एकेक गट केला. प्रत्येक गटाला एक झाड दिले. विद्यार्थ्यांनी बाटल्या झाडाच्या बुंध्याशी ठेवल्या. त्यामुळे झाडांची तहान भागली. बाटलीतील पाणी तीन-चार दिवस पुरते; त्यामुळे विद्यार्थ्यांना झाडाकडे दररोज लक्ष देण्याची गरजही राहिली नाही. बाटल्या कापून ठेवल्याने पक्ष्यांची तहानही भागली.

Web Title: Students rushed to quench the thirst of the birds in Khatav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.