खटाव शाळेत विद्यार्थ्यांनी साकारली शिवरायांची भव्य रांगाेळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:19 IST2021-02-20T05:19:54+5:302021-02-20T05:19:54+5:30
खटाव शाळेत शिवजयंतीदिनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे मुख्याध्यापक बसवराज तेली, लक्ष्मण शिंदे, सहदेव बागी यांनी केले. ...

खटाव शाळेत विद्यार्थ्यांनी साकारली शिवरायांची भव्य रांगाेळी
खटाव शाळेत शिवजयंतीदिनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे मुख्याध्यापक बसवराज तेली, लक्ष्मण शिंदे, सहदेव बागी यांनी केले. विजय पाटील, प्रज्योत बाबर, शिवम मिरजे, आण्णाप्पा कुसनाले, सुनिल कुसनाले, आकाश खोत, समर्थ घोरपडे, अविनाथ यादव, अविनाश कांबळे, लक्ष्मण पाटील, प्रसाद घोरपडे, कीर्ती जाधव, गौरी पाटील, साक्षी परीट, स्नेहा परीट, साधना पाटील यांनी सातवीच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजाची तीन तासांत रांगोळी रेखाटली. यासाठी ३० किलो रांगोळीचा वापर करण्यात आला. सुनील लांडगे यांनी मार्गदर्शन केले. सहज व सोप्या पद्धतीने रांगोळी कशी रेखाटायची याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. या रांगोळीचे उद्घाटन लक्ष्मण शिंदे, मुख्याध्यापक बसवराज तेली यांनी केले. रांगोळी पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती.