जैन समाजातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत उतरावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:33 IST2021-09-16T04:33:17+5:302021-09-16T04:33:17+5:30
ओळ : इस्लामपूर येथील गोमटेश पतसंस्थेत जिल्हा सरकारी वकील राजेश मडके यांचा सत्कार उदय देसाई, राजेंद्र पाटील यांच्याहस्ते करण्यात ...

जैन समाजातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत उतरावे
ओळ : इस्लामपूर येथील गोमटेश पतसंस्थेत जिल्हा सरकारी वकील राजेश मडके यांचा सत्कार उदय देसाई, राजेंद्र पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी विनय हुक्केरी, महावीर साधू उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : जैन समाजातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र आणि देशपातळीवरील लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवायला हवे. या परीक्षांच्या माध्यमातून वकील, न्यायाधीश होण्यासाठी जयसिंगपूर येथे वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे मोफत निवासी मार्गदर्शन केंद्र उभारण्यात आल्याची माहिती नूतन अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील राजेश मडके यांनी दिली.
येथील गोमटेश नागरी पतसंस्थेच्यावतीने मडके यांची अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील म्हणून निवड झाल्याबद्दल अध्यक्ष उदय देसाई यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष शीतल राजमाने, कार्यलक्षी संचालक संजय कबुरे, सुभाष राजमाने, सुरेश कबुरे उपस्थित होते.
देसाई म्हणाले, राजेश मडके यांनी २००२ मध्ये राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून यश मिळवले. अलिबाग, कऱ्हाड, इस्लामपूर, मिरज, जयसिंगपूर येथे २० वर्षांची सेवा केली आहे. त्यांनी अनेक गुन्ह्यांत लक्षवेधी कामकाज केले आहे.
यावेळी संचालक राजेंद्र ढबू, किरण शेटे, महावीर बापुळे, अभंग भोजणे, राजेंद्र पाटील, सुरेश खवळे, सुजाता करांडे, पद्मजा दांड, सुभाष कडगावे, अरविंद कबुरे, विनय हुक्केरी, सुनील पाटील, महेंद्र पाटील उपस्थित होते. महावीर साधू यांनी आभार मानले.