तासगावात विद्यार्थिनीची आत्महत्या

By Admin | Updated: April 3, 2016 03:49 IST2016-04-03T03:49:44+5:302016-04-03T03:49:44+5:30

उच्च शिक्षण होणार नसल्याच्या कारणाने

Student Suicide of Hours | तासगावात विद्यार्थिनीची आत्महत्या

तासगावात विद्यार्थिनीची आत्महत्या

तासगाव : येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनीने आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षण होणार नसल्याच्या कारणाने राहत्या घरी ओढणीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. याबाबत तासगाव पोलिसात नोंद झाली आहे.
येथील पागा गल्ली येथील शिवांजली महादेव घोडके (वय २२) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. आई-वडिलांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने शिवांजली व तिची मोठी बहीण आजोळीच शिक्षण घेत होत्या. येथेच त्यांचे शालेय शिक्षण झाले आहे. शिवांजलीची मोठी बहीण पुणे येथे शिक्षण घेत आहे. शुक्रवारी रात्री कु टुंबासमवेत तिने जेवण केले व मामाच्या घरी झोपण्यास गेली. सकाळी नऊपर्यंत ती आली नसल्याने घराच्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. पण दरवाजा न उघडल्याने खिडकीतून पाहिले असता, तिने लोखंडी अ‍ॅँगलला गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याचे लक्षात आले. तिची उच्च शिक्षण घेण्याची इच्छा होती, पण आर्थिक पाठबळ नसल्याने तिला शिक्षण घेता न आल्याने तिने आत्महत्या केल्याचे आजोबांनी सांगितले. याप्रकरणी शिवांजलीचे मामा परशुराम वाघमारे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.
 

Web Title: Student Suicide of Hours