शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
2
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
3
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
4
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
6
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
7
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
8
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
9
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
10
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
11
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
12
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
13
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
14
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
15
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
16
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
17
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
18
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
19
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
20
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी परिषद निवडणुका जाहीर झाल्याने लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 23:31 IST

१६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. त्याचदिवशी सायंकाळी अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार आहे.

ठळक मुद्देमतदान २१ सप्टेंबरला : २३ रोजी मतमोजणी; जिल्ह्यातील ८९ महाविद्यालयांमधील आरक्षणही जाहीर

अविनाश कोळी ।सांगली : तब्बल २५ वर्षांच्या खंडानंतर पुन्हा महाविद्यालयात विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका होत आहेत. यासाठी शिवाजी विद्यापीठाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून विद्यापीठाअंतर्गत २९४, तर जिल्ह्यातील ८९ महाविद्यालयांमध्ये २१ सप्टेंबरला मतदान व २३ सप्टेंबर रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे विद्यार्थी संघटना व इच्छुक विद्यार्थ्यांची लगबग सुरू झाली आहे.

लोकशाही मार्गाने सार्वत्रिक मतदानाच्या माध्यमातून पुन्हा एकदा कॅम्पसवर विद्यार्थ्यांना नेतृत्व करण्यास वाव मिळावा, यासाठी या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांमुळे विद्यार्थी संघटना, विद्यार्थी यांच्यात चैतन्य निर्माण झाले असून, महाविद्यालयात आता राजकीय वातावरण तापले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्रमानुसार ६ सप्टेंबररोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत महाविद्यालयांनी मतदारयाद्या प्रसिद्ध करावयाच्या आहेत. त्यानंतर ९ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजेपर्यंत हरकती नोंदविण्यासाठी मुदत आहे. त्यानंतर त्याचदिवशी सायंकाळी ५ वाजता अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करायची आहे.

१३ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजेपर्यंत महाविद्यालय आणि विद्यापीठ परिसरामध्ये अध्यक्ष, सचिव, महिला प्रतिनिधी आणि आरक्षित संवर्ग प्रतिनिधींकरिता उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत राहणार आहे. त्याचदिवशी सायंकाळी ४ वाजेपर्यंत दाखल अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. त्यानंतर ४ वाजताच वैध उमेदवारी अर्जांची यादी प्रसिद्ध केली जाईल. १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. त्याचदिवशी सायंकाळी अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार आहे.चार तास मतदानासाठी२१ सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते दुपारी २ या वेळेत मतदान होणार आहे. २३ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात होईल. त्यानंतर निकाल जाहीर होईल. यातून अध्यक्ष, सचिव, महिला प्रतिनिधी व आरक्षित संवर्ग प्रतिनिधी निवडले जातील. त्यानंतर प्राचार्यांकडून एनएसएस, एनसीसी, क्रीडा, सांस्कृतिक या क्षेत्रांच्या चार प्रतिनिधींचे उमेदवार जाहीर केले जाणार आहेत.असे होईल मतदान...मतपत्रिकेवर आडनावाने सुरू होणारी उमेदवारांची नावे इंग्रजी वर्णानुक्रमाने नमूद करण्यात येतील.

वर्गप्रतिनिधी व विद्यापीठ विभाग विद्यार्थी परिषदेला किंवा महाविद्यालय विद्यार्थी परिषदेला निवडून द्यावयाचे अध्यक्ष, सचिव, महिला प्रतिनिधी व राखीव प्रवर्गातील प्रतिनिधी यासाठी वेगळ्या मतपेट्या.

विद्यार्थ्याला एकूण कमाल पाच मते देण्याचा हक्क.इंग्रजी किंवा मराठीत केवळ अंकात पसंतीक्रम.निवडणूक सरळ बहुमताच्या तत्त्वानुसार.

टॅग्स :Sangliसांगलीcollegeमहाविद्यालयElectionनिवडणूक