शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: झेडपी निवडणुकीमुळे चिंचली यात्रेतील एसटीचे उत्पन्न घटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 16:44 IST

गतवर्षीच्या तुलनेत सांगली विभागाला ६ लाख ९३ हजारांची तूट; भाविकांनी एसटीकडे फिरवली पाठ

प्रसाद माळीसांगली : विविध यात्रा आणि सण, उत्सवांदरम्यान जादा वाहतुकीमुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा सांगली विभाग उत्पन्न वाढीमध्ये नेहमी अग्रेसर असतो. मात्र, यंदाच्या चिंचली यात्रेदरम्यान जादा एसटी बसेसचे नियोजन करूनही विभागाला गतवर्षीच्या तुलनेत उत्पन्नात ६ लाख ९३ हजारांची घट झाली आहे. जिल्हा परिषद निवडणुकांमुळे भाविकांनी यात्रेकडे पाठ फिरवल्याने एसटीला हा तोटा सहन करावा लागला आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!जिल्ह्यात नुकतीच जिल्हा परिषदेची निवडणूक पार पडली. ७ रोजी मतदान व ९ रोजी मतमोजणी पार पडली. याच दरम्यानच्या ३ ते ७ फेब्रुवारी या कालावधीत चिंचली (ता. रायबाग, जि. बेळगाव) येथील मायक्का देवीची यात्रा पार पडली. या यात्रेसाठी जिल्ह्यातील अनेक भाविक मोठ्या संख्येने यात्रेसाठी जातात. मात्र यावेळी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमुळे भाविकांचा यात्रेला फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे एसटीच्या उत्पन्नातून स्पष्ट झाले आहे.यंदा सांगली विभागाने चिंचली यात्रेसाठी ७१ जादा बसेसची सोय केली होती. त्यातून २८ लाख ६३ हजार ३०६ रुपये इतके उत्पन्न मिळाले. या काळात २५ हजार ७७५ भाविकांनी एसटीने प्रवास केला. गतवर्षी विभागाने यात्रेसाठी ९७ जादा बसेसचे नियोजन केले होते. त्यातून एसटीला ३५ लाख ५६ हजार ७१३ रुपये इतके उत्पन्न मिळाले होते. तर ३२ हजार ६९१ भाविकांनी प्रवास केला होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा विभागाला ६ लाख ९३ हजार ४०७ रुपयांची घट नोंदवली गेली आहे.

आगारनिहाय पाठवलेल्या बसेस व उत्पन्न

आगारवाहनेफेऱ्याकिलोमीटरउत्पन्न एकूण प्रवासी
सांगली२९३५१६१७९३०२२,३८१
मिरज५६३,११९१,४१,५८३२,१४३
ईश्वरपूर२२२५०५१६००९४१५९३
तासगाव१२११६७४९६४६३४४२४७९०
विटा३६३३००१७५८१८१७९६
जत१६२१७०१२४३४३१२४४
आटपाडी२०२५८१४२७३१२१०६७१६३५४
क. महांकाळ४०३४६०१९७०३१२२८९
शिराळा२०२५२०१३११८९२०७७
पलूस१८१५८२७९८३३११०८
------------------
एकूण७१६११४३९४१२८६३३०६२५७७५

गतवर्षीच्या यात्रेतील उत्पन्न

वर्षवाहनेफेऱ्याकिलोमीटरउत्पन्न एकूण प्रवासी
२०२६ ७१६११४३९४१२८६३३०६२५,७७५
२०२५९७५६५ ५००८४ ३५५६७१३ ३२६९१
तफावत२६४६६१४३६९३४०७६९१६
      
English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: ZP Elections Cause Dip in Chinchli Yatra ST Revenue

Web Summary : Sangli ST division's revenue declined by ₹6.93 lakh during the Chinchli Yatra due to fewer pilgrims attending because of the Zilla Parishad elections. Despite deploying 71 buses, passenger numbers and income fell compared to last year's 97 buses.