शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: दिवसा हातात कोयता अन् रात्री झोपडीत पेटते शिक्षणाची ज्योत, ऊसतोड मजुराच्या मुलींचे संघर्षमय जीवन

By हणमंत पाटील | Updated: January 1, 2024 16:08 IST

सहदेव खोत  पुनवत : ज्या वयात खेळावे, बागडावे, बालपणीची मौजमजा करावी, शाळेत जाऊन शिक्षण घ्यावं, त्या वयातच नियतीने त्यांना ...

सहदेव खोत पुनवत : ज्या वयात खेळावे, बागडावे, बालपणीची मौजमजा करावी, शाळेत जाऊन शिक्षण घ्यावं, त्या वयातच नियतीने त्यांना हातात कोयता घ्यायला लावला आहे. दिवसभर कुटुंबासमवेत ऊसतोड करावी. सायंकाळी झोपडीवर परतावं आणि चूल पेटवून पोटापाण्याची तजवीज करावी. पण दिवसभर ऊसतोडी करून थकलेले हात अन् शिणलेलं अंग असतानाही शिक्षणात खंड पडू नये. म्हणून या चिमुकल्या बहिणी एकमेकीसोबत दिव्याच्या मिणमिणत्या उजेडात हातात पुस्तक घेऊन समृद्ध भविष्यासाठी शिक्षणाची ज्योत पेटवितात.रात्रीच्या गर्भातून उद्याचा उष:काल होईल अशी सुंदर स्वप्ने रंगवीत त्यांच्या आयुष्यात शिक्षणाचे रंग भरले जात आहेत. बीड येथून कुटुंबासमवेत ऊसतोड करण्यासाठी पुनवत (ता. शिराळा) येथे आलेल्या पाच शाळकरी बहिणींची. सौफिया, जीनत, फिरदोस, सादिया व मुस्कान अशी या संघर्षमय जीवन जगणाऱ्या पाच बहिणींची नावे आहेत. चाँद अब्बास शेख हे बीडचे रहिवासी. आपल्या कुटुंबासह गेली पाच वर्षे ते पुनवत येथे ऊसतोड करण्यासाठी येतात. याही वर्षी ते आले आहेत. चाँद यांना पाच मुली व एक मुलगा. कुटुंबात एकूण अकरा माणसं. गावाकडे पोटापुरती जमीन आहे पण तीही कोरडवाहू.त्या मिळकतीत पोट भरत नाही म्हणून चाँद हे गेले पंधरा वर्षापासून ऊसतोड हंगामात आपल्या कुटुंबासह भटकंती करतात. संसाराचा डोलारा सांभाळतात. मात्र संसाराच्या या रहाटगाडग्यात त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची मात्र आबाळ होते . चाँद यांनी आपल्या पाच मुलींना बीडमधील एका नामांकित उर्दू शाळेत शिक्षणासाठी घातले खरे. मात्र परिस्थितीमुळे त्यांना आपल्या मुलींना नियमित शिक्षण देता आलेले नाही. त्यांच्या सौफिया व जिनत या जुळ्या मुली दहावीत, फिरदोस ही आठवीत, मुस्कान ही तिसरीत शिकत आहे तर सादिया हिने दहावीनंतर शिक्षण बंद केले आहे. 

तरीही या मुलींना शिकायचंय..आज कुटुंबासमवेत ऊसतोडीसाठी शिराळा येथे राहताना या पाच बहिणींना सकाळी कोयता हातात घेऊन आपल्या वडिलांच्या सोबत ऊसतोड करावी लागते. उसाच्या मोळ्या बांधून डोक्यावरून वाहून ट्रॅक्टर भरावा लागतो. दिवसभर त्यांचं काम सुरू असतं. सायंकाळ झाली की त्या आपल्या कुटुंबासमवेत झोपडीवर परततात. यावेळी मात्र त्यांना आपल्या शिक्षणाची चिंता सतावत राहते. मग त्या आपला मोबाईल हातात घेतात व शाळेच्या व्हाट्सअप ग्रुपवर काय अभ्यास आलाय हे पाहतात. तसेच युट्युब वरून धडे पाहतात. पुस्तक लेखणी हातात घेतात. यावेळी त्यांच्या अवतीभोवती असते ती केवळ तट्ट्याची झोपडी. ना त्यांच्या अभ्यासाला इथे खोली असते. ना टेबल-खुर्ची.ना कुठला .. पण तरीही या मुलींना शिकायचंय.

गरज शासनाच्या मदतीची..नवीन शिक्षण पद्धतीने उद्याचा निपुण भारत घडवत असताना या महाराष्ट्र कन्यांच्या व्यथा कोण जाणून घेणार? यांना गरज आहे शासनाच्या मदतीची. समाजाच्या सहकार्याची. स्थिर जीवनाची व उज्वल आयुष्यासाठी नियमित शिक्षणाची.

टॅग्स :SangliसांगलीsugarcaneऊसStudentविद्यार्थीEducationशिक्षण