शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यावरून संघर्ष, जत शहरामध्ये छावणीचे स्वरुप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 12:41 IST

पुतळा बसविण्यावरून आजी-माजी आमदारांमध्ये राजकीय जुगलबंदी

जत : जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शिवजयंतीपूर्वी बसवण्याची भूमिका समितीने घेतली आहे. तर सर्व कागदपत्रांची पूर्तता आणि परवाने मिळाल्याशिवाय पुतळा बसवता येणार नाही, असा पवित्रा प्रशासनाने घेतला आहे. पुतळा बसविण्यावरून आजी-माजी आमदारांमध्ये राजकीय जुगलबंदी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दक्षता घेत पोलिसांचा मोठा बंदोबस्त जत शहरात मागविला आहे. त्यामुळे संपूर्ण शहराला सध्या पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.

जिल्ह्यांमधून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. राज्य राखीव दलाच्या मोठ्या सात- आठ वाहनांद्वारे राखीव पोलिसाला पाचारण केले आहे. त्यामुळे संपूर्ण शहराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. पोलिसांनी सकाळी मोठ्या प्रमाणात जत शहरामधून लाँगमार्च काढला. छत्रपती शिवरायांचा पुतळ्याचा प्रश्न मागील सोळा वर्षे रखडलेला आहे. अपघातानंतर सदरचा पुतळा व त्या ठिकाणचे बांधकाम पडल्यामुळे नवीन पुतळा बसविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

माजी आमदार विलासराव जगताप यांनी पुतळा समिती स्थापन करून छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा तयार करून घेतला आहे. सुमारे १८ लाख रुपये लोकवर्गणीतून गोळा करून हा पुतळा तयार केला होता. जयंती पूर्वी पुतळा बसणार अशी शक्यता होती. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत कोणीही कायदा हातात घेऊ नये, सर्व परवाने घेऊनच पुतळा बसवावा असे जाहीर केले आहे.

पुतळा जगतापांच्या पेट्रोल पंपाजवळपुतळा बसविण्यासाठी सर्व परवाने व त्याच्या मान्यता नसल्याने हा पुतळा बसू नये अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे मिरजेतून जतमध्ये पुतळा आणला आहे. बसविण्यासाठी सर्व परवाने व त्याच्या मान्यता नसल्याने हा पुतळा बसू नये अशी भूमिका प्रशासनाने घेत नोटीस पाठविल्या होत्या. सध्या हा पुतळा विलासराव जगताप यांचा पेट्रोल पंप असलेल्या विजापूर रस्त्यावर ठेवला आहे. त्याठिकाणी सकाळी व संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज मूर्तींची पूजा व आरती होत आहे. 

टॅग्स :SangliसांगलीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजjat-acजाट