केंद्रीय होमिओपॅथिक परिषदेच्या निंवडणुकीत संघर्ष समिती विजयी

By Admin | Updated: February 23, 2015 23:58 IST2015-02-23T23:35:08+5:302015-02-23T23:58:19+5:30

पाच जणांची निंवड : डॉ. भस्मे, पृथ्वीराज पाटील, डॉ. गोसावी पॅनेल विजयी

The struggle committee won the election of the central homeopathic council | केंद्रीय होमिओपॅथिक परिषदेच्या निंवडणुकीत संघर्ष समिती विजयी

केंद्रीय होमिओपॅथिक परिषदेच्या निंवडणुकीत संघर्ष समिती विजयी

मिरज : केंद्रीय होमिओपॅथिक परिषदेवर महाराष्ट्राच्या पाच जागांवर डॉ. अरुण भस्मे, पृथ्वीराज पाटील व डॉ. गोसावी यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचे डॉ. अरुण भस्मे, डॉ. शांतिलाल देसरडा, डॉ. रवी भोसले, डॉ. शिवदास भोसले, डॉ. दयाराम चौधरी विजयी झाले. केंद्रीय होमिओपॅथिक परिषदेवर प्रत्येक राज्यातून प्रत्येक १० हजार डॉक्टरांमागे एक प्रतिनिधी निवडण्यात येतो. राज्यात होमिओपॅथिक डॉक्टरांची संख्या ५० हजारांवर असल्याने महाराष्ट्रात पाच जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. होमिओपॅथिक डॉक्टर्स अन्याय निवारण संघर्ष समितीचे महाराष्ट्रातील होमिओपॅथिक महाविद्यालयाचे असोसिएशन व हिम्पाम या संघटनेतर्फे संघर्ष समितीच्यावतीने उमेदवार उभे करण्यात आले होते. संघर्ष समितीशिवाय कृती समितीचे पाच उमेदवार, जनरल प्रॅक्टीशनर्सचे पाच उमेदवार, परिवर्तन पॅनेलचे पाच उमेदवार व इतर नऊ, असे २९ उमेदवार होते. सदस्यांच्या निवडीबद्दल माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, केंद्रीय होमिओपॅथिक परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. एस. पी. बक्षी, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर, प्रकुलगुरू डॉ. शेखर राजदेरकर, राजिस्ट्रार डॉ. काशिनाथ गर्कळ, असोसिएशन आॅफ होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजेस आॅफ महाराष्ट्रचे अध्यक्ष आ. विक्रम काळे, सचिव पृथ्वीराज पाटील, डॉ. गजानन पोळ, डॉ. विलास पोतनीस, एकनाथ गडकरी, डॉ. खेकर, डॉ. अरविंद गवळी, केंद्रीय होमिओपॅथिक परिषदेचे सचिव डॉ. ललित वर्मा यांनी उमेदवारांचे अभिनंदन केले.
संघर्ष समितीच्या पॅनेलमधून ३, तर होमिओपॅथिक कॉलेजेसचे प्रतिनिधी म्हणून, तसेच हिम्पाम या होमिओपॅथिक प्रॅक्टीशनर असोसिएशनचे २ प्रतिनिधी निवडून आले. असोसिएशनचे अध्यक्ष आ. विक्रम काळे, सचिव पृथ्वीराज पाटील, हिम्पामचे अध्यक्ष डॉ. गोसावी यांच्या नेतृत्वाखाली हा विजय मिळाला. (वार्ताहर)

Web Title: The struggle committee won the election of the central homeopathic council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.