काँग्रेसच्या यशामागे कार्यकर्त्यांचे मजबूत संघटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:27 IST2021-01-20T04:27:09+5:302021-01-20T04:27:09+5:30
कडेगाव : महाविकास आघाडी सरकारमध्ये विश्वजित कदम यांना राज्यमंत्री पदी मिळालेली संधी आणि त्यानंतर त्यांनी केलेली कामगिरी, मतदारसंघातील ...

काँग्रेसच्या यशामागे कार्यकर्त्यांचे मजबूत संघटन
कडेगाव : महाविकास आघाडी सरकारमध्ये विश्वजित कदम यांना राज्यमंत्री पदी
मिळालेली संधी आणि त्यानंतर त्यांनी केलेली कामगिरी, मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे मजबूत संघटन हेच कडेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या यशामागचे कारण आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची सत्ता ताब्यात असतानाही भाजपला एकाही ग्रामपंचायतीत सत्तेपर्यंत पोहोचता आले नाही, यावर भाजपला आत्मचिंतन करण्याची गरज आहे.
पलूस-कडेगाव मतदारसंघात
गेल्या ३० वर्षांपासून कदम आणि देशमुख गटात सत्तासंघर्ष सुरू आहे. कॉंग्रेसचे दिग्गज नेते माजी मंत्री पतंगराव कदम यांच्याशी देशमुख गटाने झुंज देत गट मजबूत ठेवला. मात्र नुकत्याच झालेल्या नऊ ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपची पिछेहाट झाली. कडेगाव तालुक्यातील रामापूर, येतगाव, शिवणी, कोतिज, कान्हरवाडी या गावात भाजपची सत्ता होती, मात्र काँग्रेसने येथील सत्ता हस्तगत केली. शिरसगाव, सोनकिरे, अंबक आणि ढाणेवाडी या गावात काँग्रेसने सत्ता कायम राखली. यामागे दिवंगत पतंगराव कदम यांनी उभे केलेले विधायक आणि संस्थात्मक काम आणि आमदार मोहनराव कदम यांचे मार्गदर्शन महत्वाचे ठरले आहे.
सोनहिरा कारखान्याने ३१७६ रुपये एकरकमी एफआरपीप्रमाणे ऊस दर दिला. विधानसभा निवडणुकीपूर्वी महापूर आणि नंतर कोरोनाची स्थिती या संकटात जनतेच्या मदतीला धावलेल्या विश्वजित कदम यांची कामगिरी उल्लेखनीय झाली. याचा फायदा काँग्रेसला झाला आहे.
चौकट :
‘पदवीधर’च्या अपयशाने निराशा
पुणे पदवीधर निवडणुकीत
भाजपचे नेते संग्रामसिंह देशमुख यांना
अपयशाला सामोरे जावे लागले. यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये निराशा होती. ग्रामपंचायत निवडणुकांच्या
मोर्चे बांधणीकडे भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आणि संग्रामसिंह देशमुख यांचे फारसे लक्ष नव्हते. अशा स्थितीत बलाढ्य काँग्रेसशी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना एकाही गावात सत्तेपर्यंत पोहोचता आले नाही.
फोटो : मोहनराव कदम,डॉ.विश्वजित कदम, पृथ्वीराज देशमुख,संग्रामसिंह देशमुख यांचा फोटो वापरणे