काेराेना संसर्ग टाळण्यासाठी सूचनांचे काटेकाेर पालन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:28 IST2021-04-27T04:28:18+5:302021-04-27T04:28:18+5:30

कवठेमहांकाळ येथील तहसील कार्यालयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयाेजित आढावा बैठकीत ते बोलत होते. प्रारंभी खासदार संजयकाका पाटील, आमदार सुमनताई पाटील ...

Strictly follow the instructions to prevent caries infection | काेराेना संसर्ग टाळण्यासाठी सूचनांचे काटेकाेर पालन करा

काेराेना संसर्ग टाळण्यासाठी सूचनांचे काटेकाेर पालन करा

कवठेमहांकाळ येथील तहसील कार्यालयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयाेजित आढावा बैठकीत ते बोलत होते. प्रारंभी खासदार संजयकाका पाटील, आमदार सुमनताई पाटील यांनी तालुक्यातील काेराेना स्थितीबाबत गावनिहाय माहिती घेत संबंधित त्या ठिकाणी योग्य त्या उपाययोजना राबविण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

बैठकीस तहसीलदार बी. जे. गोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दत्तात्रेय पाटील, मुख्याधिकारी डॉ. संतोष मोरे, पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, तसेच पंचायत समितीचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

खासदार पाटील म्हणाले, नागरिकांनी नेहमीच मास्क वापरावा, सोशल डिस्टंसिंग ठेवावे आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. तालुक्यात आणखी बेड वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील.

आमदार सुमनताई पाटील म्हणाल्या, नागरिकांनीही प्रशासनाला साथ द्यावी आणि कोरोनाला हद्दपार करण्यासाठी सूचनांचे पालन करावे.

पंचायत समितीचे सभापती विकास हाक्के, हायुम सावनूरकर, टी. व्ही. पाटील, महेश पवार, महेश पाटील, गजानन कोठावळे, दयानंद सगरे, अनिल लोंढे, दिलीप पाटील, डॉ. बसवेश्वर म्हेत्रे, डॉ. संतोष घागरे, डॉ. कुणाल साळुंखे यांच्यासह तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Strictly follow the instructions to prevent caries infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.