भिलवडीत ८ मेपर्यंत कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:21 IST2021-05-03T04:21:16+5:302021-05-03T04:21:16+5:30
भिलवडी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अत्यावश्यक सेवा वगळता भिलवडी गाव ३ मे ते ८ मेपर्यंत कडकडीत ...

भिलवडीत ८ मेपर्यंत कडकडीत बंद
भिलवडी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अत्यावश्यक सेवा वगळता भिलवडी गाव ३ मे ते ८ मेपर्यंत कडकडीत बंद राहणार आहे. भिलवडी ग्रामपंचायत व व्यापारी संघटनेची बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. गावच्या हितासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील यांनी केले.
बंद कालावधीत रुग्णालये, औषध दुकाने व दुग्ध सेवा वगळता, इतर सर्व बंद ठेवण्यात येणार आहेत. लॉकडाऊनच्या नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायतीच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. यावेळी तलाठी गौसम हंमद लांडगे, ग्रामसेवक अजित माने, उपसरपंच पृथ्वीराज पाटील, दक्षिण भाग विकास सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब मोहिते, शहाजी गुरव, चंद्रकांत पाटील, विलास पाटील, बाबासाहेब मोहिते, रणजीत पाटील, प्रशांत कांबळे, किशोर तावदर आदी उपस्थित होते.