कवठेमहांकाळमध्ये कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:22 IST2020-12-09T04:22:08+5:302020-12-09T04:22:08+5:30
सरकारचे शेतकरीविरोधी काळे कायदे कायदे मागे घ्यावेत या मागणीसाठी मंगळवारी पुकारलेल्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा जाहीर निषेध करत ...

कवठेमहांकाळमध्ये कडकडीत बंद
सरकारचे शेतकरीविरोधी काळे कायदे कायदे मागे घ्यावेत या मागणीसाठी मंगळवारी पुकारलेल्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा जाहीर निषेध करत तहसीलदार कार्यालयासमोर कॉग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, किसान सभा, बळीराजा पार्टी, संभाजी ब्रिगेड, स्वाभिमानी शेतकरी संघटना, यांच्या वतीने मुक निदर्शने करण्यात आली. यावेळी किसान सभा, बळीराजा पार्टी, विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त केला.
यावेळी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अविराजे शिंदे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष टी. व्ही. पाटील, राष्ट्रवादीच्या नेत्या अनिता सगरे, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष मारुती पवार, वैभव गुरव, महेश पाटील, अय्याज मुल्ला, किसान सभेचे दिगंबर कांबळे, राजर्षी शाहू विचार मंचाचे दादासाहेब ढेरे, बळीराजा पार्टीचे बाळासाहेब रास्ते, संभाजी ब्रिगेडचे ऋतुराज पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिवाजी पाटील, सूरज पाटील, आदिवासी विकास महासंघाचे संजय कोळी, सुशांत शिंदे, चैतन्य पाटील उपस्थित होते.
फाेटाे : ०८ केएम १