इस्लामपुरात कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:22 IST2020-12-09T04:22:30+5:302020-12-09T04:22:30+5:30
इस्लामपूूर : केंद्र शासनाने लागू केलेल्या कृषी कायद्याविरुद्ध विविध पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला इस्लामपूर शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील ...

इस्लामपुरात कडकडीत बंद
इस्लामपूूर : केंद्र शासनाने लागू केलेल्या कृषी कायद्याविरुद्ध विविध पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला इस्लामपूर शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व व्यवहार कडकडीतपणे बंद होते. या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या होत्या. केंद्र सरकारने केलेले तीन कृषी कायदे रद्द करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली.
दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आणि केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप, प्रहार शेतकरी संघटना, आम आदमी पार्टी, वाळवा तालुका संघर्ष समिती, तसेच इस्लामपूर व्यापारी संघटनेने या बंदमध्ये सहभाग घेतला होता.
सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून बंद समर्थकांनी शहरामध्ये मोटारसायकल रॅली काढून व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन केले.
यावेळी आप्पासाहेब पाटील, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष जितेंद्र पाटील, स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष भागवत जाधव, व्यापारी संघटनेचे मोहन पाटील, उमेश कुरळपकर, प्रहारचे कॉ. दिग्विजय पाटील, बाळासाहेब पाटील, आनंदराव पाटील, अनिल करळे, जगन्नाथ भोसले, रमेश पाटील, तानाजी साठ्ये, प्रकाश देसाई, राजाभाऊ परीट, संतोष शेळके उपस्थित होते.
फोटो- ०८१२२०२०-आयएसएलएम-इस्लामपूर बंद न्यूज
इस्लामपूर शहरात भारत बंदच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी मंगळवारी कडकडीत बंद पाळला.