शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

corona cases in Sangli : कोरोना पॉझिटीव्हीटी दर कमी करण्यासाठी कडक धोरण राबवा: जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2021 12:30 IST

corona cases in Sangli : पॉझिटीव्हीटीचा दर कमी करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक निर्बंधांची कडक अंमलबजावणी करावी, मास्क न वापरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करावी. मोकाटपणे फिरणाऱ्यांची कोरोना टेस्ट करावी, पोलीसांनी गस्त वाढवावी असे आदेश जलसंपदा व लाभक्षेत्र मंत्री व सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले.

ठळक मुद्देकोरोना पॉझिटीव्हीटी दर कमी करण्यासाठी कडक धोरण राबवा: जयंत पाटीलकोरोनाचा फैलाव होवू नये यासाठी प्रसंगानुरुप कडक धोरण

सांगली : जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्ण पॉझिटीव्हीटीचा दर 10 टक्क्यांपर्यत खाली आला असताना वाळवा तालुक्यातील कोरोना पॉझिटीव्हीटीचा दर 13 टक्के आहे. वाळवा तालुक्याचा पॉझिटीव्हीटीचा दर कमी करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक निर्बंधांची कडक अंमलबजावणी करावी, मास्क न वापरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करावी. मोकाटपणे फिरणाऱ्यांची कोरोना टेस्ट करावी, पोलीसांनी गस्त वाढवावी असे आदेश जलसंपदा व लाभक्षेत्र मंत्री व सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले.गट विकास अधिकारी वाळवा यांच्यावतीने व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे वाळवा तालुक्यातील कोरोना सद्यस्थिती आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पंचायत समिती सभापती शुभांगी पाटील, वाळव्याचे गट विकास अधिकारी शशिकांत शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साकेत पाटील, इस्लामपूरचे पोलीस निरिक्षक एन.एस. देशमुख, आष्टाचे पोलीस निरीक्षक बी.आर. निंभोरे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, विविध ग्रामपंचयातींचे सरपंच यावेळी सहभागी झाले होते.वाळवा तालुक्यात सद्यस्थितीत 1 हजार 749 कोरोना बाधित रुग्ण आहेत. कोरोनाचे 32 हॉटस्पॉट आहेत तर कोरोना पॉझिटीव्हीटी रेट 13 टक्के आहे. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, कोरोना पॉझिटीव्हचा रिपोर्ट येणाऱ्या व्यक्तींच्या घरातील सर्वांची टेस्ट करण्यात यावी.

कोरोना आटोक्यात आणण्यासाठी कॉन्टक्ट ट्रेसिंग वाढविण्यावर भर दिला पाहिजे, टेस्ट करुन घेण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना प्रवृत्त केले पाहिजे, यामुळे अदृष्य केसेस समोर येतील. टेस्टींगचे प्रमाण वाढले की. बाधित रुग्णांची संख्या वाढेल पण त्यामुळे तातडीने उपचार करणे शक्य होईल. बरेचसे लोक लक्षणे जाणवल्यास खाजगी डॉक्टरांकडे जावून टेस्ट न करताच उपचार घेतात. त्यामुळे कोरोनाचा फैलाव जास्त होतो. अशा वेळी खाजगी डॉक्टरांनीही अशा बाधितांची माहिती शासकीय यंत्रणांनी दिली पाहिजे.कोरोना बाधितांची संख्या जास्त असणाऱ्या गावांमध्ये स्थानिक प्रशासनाने संस्थात्मक विलगीकरण करण्यावर जास्त भर दिला पाहिजे. गावच्या सरपंचानी व दक्षता समित्यांनी दक्ष राहून काम करणे आवश्यक आहे. गावात कोरोनाचा फैलाव होवू नये यासाठी प्रसंगानुरुप कडक धोरण अवलंबविले पाहिजे.

संस्थात्मक विलगीकरण सक्तीने केले पाहिजे, अशा सूचना करुन पालकमंत्री जयंत पाटील यांनी कामेरी, येडे निपाणी, पेठ, बागणी, नेर्ले, वाटेगाव, मालेवाडी, कासेगाव, रेठरेधरण, भडकंबे, वाळवा, शिगाव, साखराळे, गोटखिंडी, बावची, ऐतवडे खुर्द व बुद्रूक, येलूर, चिकुर्डे, तांबवे, कुरळप, कार्वे, नवेखेड या गावच्या सरपंचांशी संवाद साधला व त्यांनी गावात राबविलेल्या उपाय योजनांची माहिती घेतली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJayant Patilजयंत पाटीलSangliसांगली