देवराष्ट्रेत बुधवारपासून सहा दिवस कडक लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:30 IST2021-05-25T04:30:47+5:302021-05-25T04:30:47+5:30
किराणासह सर्व व्यवहार बुधवार, दि. २६ ते सोमवार दि ३१ मे असे सहा दिवस बंद ठेवण्याचा निर्णय ...

देवराष्ट्रेत बुधवारपासून सहा दिवस कडक लॉकडाऊन
किराणासह सर्व व्यवहार बुधवार, दि. २६ ते सोमवार दि ३१ मे असे सहा दिवस बंद ठेवण्याचा निर्णय आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. प्रांताधिकारी गणेश मरकड व तहसीलदार शैलेजा पाटील, सरपंच प्रकाश माेरे, उपसरपंच दिनकर पवार, ग्रामविकास अधिकारी उत्तम पाटील आदी उपस्थित होते.
सहा दिवस कोणीही नियम मोडू नयेत; अन्यथा पाच हजार रुपये दंड व कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. मंगळवार, दि. २५ रोजी एक दिवस गावातील अत्यावश्यक व्यवहार सुरू राहणार आहेत. गावात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे होम आयसोलेशन बंद केले आहे. सर्व कोरोना रुग्णांची सोय जि. प. शाळेत करण्यात येणार आहे, याची पाहणीही प्रांताधिकारी गणेश मरकड व तहसीलदार शैलेजा पाटील यांनी केली.