बाेरगावमध्ये लॉकडाऊनची काटेकाेर अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:24 IST2021-04-19T04:24:49+5:302021-04-19T04:24:49+5:30

बोरगाव : बाेरगाव (ता. वाळवा) येथे २० ते २६ एप्रिलअखेर कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय रविवारी आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत ...

Strict implementation of lockdown in Baergaon | बाेरगावमध्ये लॉकडाऊनची काटेकाेर अंमलबजावणी

बाेरगावमध्ये लॉकडाऊनची काटेकाेर अंमलबजावणी

बोरगाव : बाेरगाव (ता. वाळवा) येथे २० ते २६ एप्रिलअखेर कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय रविवारी आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्याचे ठरले. सरपंच, उपसरपंच यांच्यासह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

बंदमधून दूध संस्था, रुग्णालये आणि औषध दुकाने यांना वगळण्यात येणार आहे.

गेल्या आठवडाभरापासून बोरगावात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६० वर गेली आहे तर पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोराेनाची साखळी ताेडण्यासाठी गावात कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय रविवारी आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाला ग्रामस्थांनी सहकार्य करावे. कुणीही चुकीची भूमिका घेऊ नये, कोरोनाला हरवण्यासाठी सर्वांनी एकत्रित यावे, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले.

Web Title: Strict implementation of lockdown in Baergaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.