आरआयटीमध्ये कोरोना प्रतिबंधक उपायांची कडक अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:49 IST2021-03-04T04:49:34+5:302021-03-04T04:49:34+5:30

इस्लामपूर : ‘आरआयटी’ने योग्य ती खबरदारी घेऊन महाविद्यालय सुरू केले आहे. शासनाच्या निर्देशानुसार कोरोना प्रतिबंधक सर्व उपाययोजनांची कडक अंमलबजावणी ...

Strict implementation of corona preventive measures in RIT | आरआयटीमध्ये कोरोना प्रतिबंधक उपायांची कडक अंमलबजावणी

आरआयटीमध्ये कोरोना प्रतिबंधक उपायांची कडक अंमलबजावणी

इस्लामपूर : ‘आरआयटी’ने योग्य ती खबरदारी घेऊन महाविद्यालय सुरू केले आहे. शासनाच्या निर्देशानुसार कोरोना प्रतिबंधक सर्व उपाययोजनांची कडक अंमलबजावणी पहिल्या दिवसापासून करण्यात आली आहे. कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची माहिती देण्यात आली असल्याचे संचालिका डॉ. सुषमा कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझेशन आणि शरीराचे तापमान तपासण्याची योग्य ती व्यवस्था केली आहे. सर्वांना चांगल्या प्रतीचे मास्क वापरण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच महाविद्यालयात ठिकठिकाणी सॅनिटायझर मशीन बसविण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता काही वर्गांसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन असे दोन्ही पर्याय ठेवण्यात आले आहेत. महाविद्यालयातील वर्ग खोल्यांचे दिवसातून दोनदा सॅनिटायझेशन केले जात आहे. ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून दर एका तासाला सोशल डिस्टन्सिंग आणि सॅॅनिटायझेशनसंबंधी सूचना दिल्या जातात. तसेच महाविद्यालय परिसरात रुग्णवाहिकेची २४ तास व्यवस्था केली आहे. कोणालाही कोरोनाची लक्षणे दिसून आल्यास विलगीकरणाची व्यवस्थादेखील केली आहे.

Web Title: Strict implementation of corona preventive measures in RIT