नियमांचे पालन न केल्यास कडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:34 IST2021-04-30T04:34:17+5:302021-04-30T04:34:17+5:30

फोटो ओळ- गव्हाण (ता. तासगाव) येथील आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत तासगावचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन केराम यांनी मार्गदर्शन केले. ...

Strict action if rules are not followed | नियमांचे पालन न केल्यास कडक कारवाई

नियमांचे पालन न केल्यास कडक कारवाई

फोटो ओळ- गव्हाण (ता. तासगाव) येथील आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत तासगावचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन केराम यांनी मार्गदर्शन केले.

लोकमत न्यूज नेटवर्क

गव्हाण : तासगाव पूर्व भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. असे असूनही गव्हाण, मणेराजुरी, सावळज, अंजनी, वडगाव परिसरात नागरिक नियमांचे पालन करत नाहीत. यामुळे तासगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन केराम यांनी परिसरात पाहणी केली व नियमावलीचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिली. गव्हाण येथे बैठक झाली.

ग्रामीण भागात कोरोनाचा विषय चिंताग्रस्त बनत आहे. लोक नियमांचे पालन करत नसल्याचे दिसत असल्याने नितीन केराम यांनी गव्हाण, अंजनी, मनेराजुरी या गावांची पाहणी करून प्रत्येक गावात बैठका घेतल्या. पोलीस कर्मचाऱ्यांनी कडक भूमिका घेण्याच्या सूचनाही दिल्या. गावातील कोरोनास्थिती रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन समितीने मदत करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी करण्यात आले.

या बैठकीला गव्हाणचे सरपंच हणमंत पाटील, उपसरपंच रावसाहेब सरवदे, ग्रामसेवक संजय देशमुख, तलाठी शिवाजी चव्हाण, महेश निकम, समीर आवळे, अमोल कोरे, पोलीस पाटील, शिवाजी पाटील, विनायक पाटील, सचिन काशीद, राजू पवार आदी उपस्थित होते.

Web Title: Strict action if rules are not followed