विनाकारण, विनामास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:25 IST2021-04-18T04:25:25+5:302021-04-18T04:25:25+5:30
लेंगरे : संचारबंदीत विनाकारण, विनामास्क मोकाट फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा प्रांताधिकारी संतोष भोर यांनी लेंगरे (ता. खानापूर) येथे ...

विनाकारण, विनामास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाई
लेंगरे : संचारबंदीत विनाकारण, विनामास्क मोकाट फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा प्रांताधिकारी संतोष भोर यांनी लेंगरे (ता. खानापूर) येथे दिला.
लेंगरे येथे शनिवारी सकाळी महसूल विभाग, आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीच्या आपत्ती व्यवस्थापन समितीने मोहीम राबवली. संचारबंदी असताना विनाकारण विनामास्क फिरत असलेल्या नागरिकांची आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी कोरोना रॅपिड चाचणी करण्याचा धडाका लावला. यावेळी दुचाकीवरून मोकाट फिरत असलेल्या तरुणांचीही कोरोना चाचणी करण्यात आली.
यावेळी प्रांताधिकारी संतोष भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी अंकुश इंगळे, पोलीस अमोल पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ.माधवी चव्हाण, सरपंच राधिका बागल व आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्रामविकास अधिकारी संजय भोते, हर्षवर्धन बागल, नानासाहेब मंडलिक, कोतवाल विनायक शिंदे, सुखदेव कोळी पथकात सहभागी होते.