लेंगरेत नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:25 IST2021-05-10T04:25:37+5:302021-05-10T04:25:37+5:30
लेंगरे : लेंगरे येथे कोरोना संसर्ग वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन, आरोग्य विभागातील डॉक्टर व कर्मचारी आपला जीव ...

लेंगरेत नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई
लेंगरे : लेंगरे येथे कोरोना संसर्ग वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन, आरोग्य विभागातील डॉक्टर व कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून रात्रंदिवस काम करीत आहेत. अशा परिस्थितीतही नागरिकांकडून कोणतेही नियमांचे काटेकोर पालन होत नाही. परिणामी लाकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई मोहीम राबविण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी सांगितले. लेंगरेत कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असून नागरिकांकडून नियमांचे पालन होत नाही. यामुळे गावात विनाकारण व विनामास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाईची सूचना केली.
संतोष डोके यांनी लेंगरेतील कोरोना संसर्गाचा आढावा घेऊन ग्रामपंचायतीस सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कडक निर्बंध लागू करण्याबाबत सूचना दिल्या. तसेच कोरोना संसर्ग ठिकाणी मिनी कन्टेंन्मेंट झोन, कोरोना चाचण्या कराव्यात. आशा वर्करनी घरोघरी भेटी देऊन होम आयसोलेशन रुग्णांची व घरातील सर्व नागरिकांची माहिती घेतली. आरोग्य विभागातील डॉक्टर व कर्मचारी लक्ष देण्याबाबत सूचना दिल्या.
पोलीस उपनिरीक्षक गायकवाड, पोलीस हवालदार अमोल पाटील, अक्षय माने तसेच आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रशांत सावंत, सुनिल पाटील, विलास मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य फिरोज शेख, सुरेश चिंचणकर, हर्षवर्धन बागल, पोलीस पाटील पुष्पा बोबडे उपस्थित होते.