लॉकडाऊनचे नियम तोडणाऱ्यांवर कडक कारवाई -दीपक जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:26 IST2021-05-08T04:26:43+5:302021-05-08T04:26:43+5:30
तांदूळवाडी : लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू आहे. तरी विनाकारण तसेच विनामास्क फिरणे, गर्दी करून उभा राहणे अशा लोकांवर कडक ...

लॉकडाऊनचे नियम तोडणाऱ्यांवर कडक कारवाई -दीपक जाधव
तांदूळवाडी : लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू आहे. तरी विनाकारण तसेच विनामास्क फिरणे, गर्दी करून उभा राहणे अशा लोकांवर कडक कारवाई केली जाणार आहे, असा इशारा कुरळप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी दिला.
त्यांनी कुंडलवाडी (ता. वाळवा) येथील नागरिकांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, सध्या कोरोनासारख्या रोगाने तोंड वरती काढले आहे. याचा प्रसार जोराचा होत आहे. यावर निर्बंध घालण्यासाठी शासनस्तरावर असणाऱ्या विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. आपण नियम पाळून सहकार्य करावे. सध्या विनाकारण फिरणारे विनामास्क सार्वजनिक ठिकाणी थांबणे, गर्दी करून उभा राहणे, असे अनेक लोकांकडून आढळून येत आहे. यावर निर्बंध घालण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करत आहे, शिवाय प्रसंगी कडक कारवाई केली जाईल.