काेराेनाविराेधी लढ्यास ‘साेशल डिस्टन्सिंग’ने बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:25 IST2021-03-08T04:25:06+5:302021-03-08T04:25:06+5:30

———————————- एन्ट्राे काेराेनाची धास्ती अद्याप लाेकांच्या मनातून गेलेली नाही. यामुळेच सुरुवातीला सक्तीचे वाटणारे साेशल डिस्टन्सिंग आज लाेकांना आवश्यक वाटत ...

Strengthening the fight against Kareena with ‘social distance’ | काेराेनाविराेधी लढ्यास ‘साेशल डिस्टन्सिंग’ने बळ

काेराेनाविराेधी लढ्यास ‘साेशल डिस्टन्सिंग’ने बळ

———————————-

एन्ट्राे

काेराेनाची धास्ती अद्याप लाेकांच्या मनातून गेलेली नाही. यामुळेच सुरुवातीला सक्तीचे वाटणारे साेशल डिस्टन्सिंग आज लाेकांना आवश्यक वाटत आहे. किरकाेळ दुकानदारांपासून सुपर मार्केट्सपर्यंत व्यावसायिकांनी याेजिलेल्या काेराेनाबाबतच्या उपाययाेजना लाेक सहजपणे स्वीकारत आहेत. त्यास सहकार्य करत आहेत.

———————————-

गेल्या वर्षभरात कोरोनाने संपूर्ण जगालाच हादरवून टाकले. भारतात आणि त्यातही विशेष करून महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या तुलनेने अधिक असल्याने विशेष खबरदारी घ्यावी लागली. रोज नवीन शासन आदेश, नागरिकांसाठी रोज नवीन सूचना, सोशल डिस्टन्सिंगचे नियम, या सर्वांचा अर्थ लावून जगताना सामान्यांची पुरती पुरेवाट झाली. त्याचबरोबर लॉकडाऊन ते अनलॉकच्या विविध टप्प्यांमध्ये व्यापारी, उद्योजक व वाहतूकदारांचेही प्रचंड हाल झाले. किरकोळ व्यापाऱ्यांपासून अगदी सुपर मार्केटपर्यंत सर्वांनीच ‘लायसनराज’चा पुरेपूर अनुभव या वर्षभरात घेतला. या सर्वावर मात करून गेल्या काही दिवसांमध्ये उद्योग, व्यवसाय सावरताहेत, ही मोठी दिलासादायक बाब आहे.

देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर गतवर्षी १९ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २२ मार्च रोजी जनतेने स्वयंस्फूर्तीने एक दिवसाचा जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले. या एक दिवसाच्या जनता कर्फ्यूपासून सुरू झालेला स्वत:ला कोंडून घेण्याचा प्रवास जवळपास नऊ महिने सुरूच राहिला. किराणा दुकाने, दूध, भाजीपाला, औषधे अशा जीवनावश्यक सेवा-सुविधा वगळता, सर्वच व्यापार, व्यवहार, उद्योग, व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश आल्याने संपूर्ण बाजारपेठेची कोंडी झाली. आपला उद्योग-व्यवसाय म्हणजे आपले साम्राज्य आणि आपण त्याचे अनभिषिक्त सम्राट, अशा तोऱ्यात आजवर वावरणारे उद्योजक, व्यावसायिक या काळात सरकारी ताबेदारी म्हणजे काय, याचा पुरेपूर अनुभव घेऊन बसले.

दररोज निघणारे शासनआदेश, कालच्या आदेशाचा संदर्भ आजच्या आदेशाशी जुळवून त्याची अंमलबजावणी करताना जे काही घोळ उडाले, ते कल्पनातीतच होते. पण लोकांनी कामाशिवाय बाहेर पडू नये, रस्त्यांवर-बाजारपेठांमध्ये गर्दी करू नये, हाच शुध्द हेतू यामागे होता, हे निश्चित.

लॉकडाऊन ते अनलॉकच्या विविध टप्प्यांमध्ये सामान्य लोकांचे हाल होऊ नयेत, यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या. दूध, किराणा, भाजीपाला, औषधे अशा जीवनावश्यक वस्तूंच्या विक्री व वितरणास सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून परवानगी देण्यात आली होती. दुकानदारांना दुकानासमोर कुठेही गर्दी होणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले होते. ‘नो मास्क-नो एन्ट्री’सारख्या मोहिमा राबविण्यात आल्या. दुसरीकडे या अभूतपूर्व स्थितीचा व्यापारी-किराणा दुकानदारांनी गैरफायदा घेऊ नये, लोकांची आर्थिक पिळवणूक करू नये, यावर लक्ष ठेवण्यासाठी एक समांतर यंत्रणा कार्यरत होती. सोशल डिस्टन्सिंग ही संकल्पना नेमकी काय, हे लोकांना समजावण्यासाठी प्रबोधन करण्यात आले.

या छोट्या व्यावसायिकांनीही स्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाला सहकार्य केले. सर्वात पहिल्यांदा आपल्या दुकानाच्या समोरील बाजूस दोऱ्या आडव्या बांधून, फलक बांधून समोरचा ग्राहक आपल्यापासून पाच ते सहा फूट अंतरावर राहील याची खबरदारी घेतली. दुकानासमोर गर्दी होऊ नये, यासाठी सहा फुटाच्या अंतराने वर्तुळ आखून सुरक्षित अंतर राखून रांगेने ग्राहक समोर येतील, अशी व्यवस्था केली. स्वत: मास्क, फेसशिल्ड, सॅनिटायझरचा वापर सुरू केला. ग्राहकांसाठीही सॅनिटायझरचा वापर अनिवार्य केला. एक ग्राहक बाहेर पडल्यानंतर लगेचच सॅनिटायझर फवारून नंतर पुढील ग्राहकास सेवा देण्याचे धोरणही अनेकांनी राबविले. ग्राहकांना साहित्य देताना तसेच त्यांच्याकडून पैसे घेताना डिस्पोजेबल हॅन्डग्लोव्हज्‌चा वापर सुरू केला. बहुतांश व्यापाऱ्यांनी रोखीचे व्यवहार टाळून डिजिटल पेमेंटला प्राधान्य दिले. यामुळेच या काळात ‘फोन पे’सारख्या विविध युपीआय प्लॅटफॉर्मच्या वापरात लक्षणीय वाढ झाली.

एकीकडे गल्लोगल्ली किरकोळ किराणा दुकाने सुरू असताना, मोठे मॉल व सुपरमार्केट मात्र बंदच होते. ‘मुळात जितकी गर्दी तितका व्यवसाय अधिक’, हे या मॉल, सुपर मार्केटच्या संस्कृतीचे तत्त्व. यामुळे या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन होणार कसे? हा प्रश्न गंभीर होता. पण बाजारपेठेची गरज आणि सुपर मार्केटच्या व्यवस्थापनांनी कोरोनाबाबत सुरक्षितता आणि सोशल डिस्टन्सिंगच्या पालनाबाबत हमी दिल्यानंतर सुपर मार्केटस्‌ना परवानगी देण्यात आली.

सुपर मार्केटस्‌च्या व्यवस्थापनांनीही अत्यंत जबाबदारीने यंत्रणा राबवत ग्राहकाभिमुख सेवेवर भर दिला. ग्राहकांनी सुपर मार्केटमध्ये गर्दी न करता घरबसल्या शॉपिंग करावे, यासाठी स्वत:चे मोबाईल अ‍ॅप तयार करून ग्राहकांना ऑनलाईन खरेदीसाठी प्रोत्साहन दिले. घरपोच किराणा साहित्य पोहोचविले. सुपर मार्केटमध्ये येणारा ग्राहक अवघ्या दहा मिनिटामध्ये खरेदी आटोपून बाहेर पडेल, यादृष्टीने यंत्रणा राबविली. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला प्रवेश देण्याचे धोरण अवलंबले. मास्कचा वापर अनिवार्य केला. प्रवेशद्वारावरच सॅनिटायझरची सोय केली. आलेल्या ग्राहकांची वेळेनुसार नोंद घेऊन त्यांची नावे, मोबाईल क्रमांक, पत्ता यासाठी एक स्वतंत्र रजिस्टर तयार केले. थर्मल गनचा वापर करून आलेल्या प्रत्येक ग्राहकाच्या शरीराच्या तापमानाची नोंद घेतली. एखाद्या ग्राहकाच्या शरीराचे तापमान नियमित तापमानापेक्षा जास्त असल्यास त्यास प्रवेश नाकारून कोरोना चाचणीचा सल्ला देण्याचे धारिष्ट्‌यही दाखविले. ‘फॉलो द कस्टमर’ संकल्पना राबवून आलेल्या प्रत्येक ग्राहकासोबत आपला प्रतिनिधी जोडून देत ग्राहकाला हव्या असलेल्या वस्तू त्याला तात्काळ उपलब्ध करून देत, तो लवकरात लवकर आपली खरेदी आटोपून बाहेर पडेल, यादृष्टीने नियोजन केले.

हे सर्व करत असताना आपल्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी सर्व पातळीवर खबरदारी घेतली. त्यांच्या वेळा बदलल्या. कामाच्या संपूर्ण वेळेत मास्क-फेसशील्डचा वापर अनिवार्य केला. ग्राहकांना फॉलो करत असताना सोशल डिस्टन्सच्या पालनाबाबत योग्य ती खबरदारी कशी घेतली जाईल, याकडेही काटेकोरपणे लक्ष दिले. सुपर मार्केटमध्ये वेगवेगळ्या विभागांमध्ये काम करणारे कर्मचारी एकमेकांच्या संपर्कात येणार नाहीत, याचीही काळजी घेतली. अनेक सुपर मार्केट्सनी कामकाजाच्या संपूर्ण वेळेमध्ये सॅनिटायझेशन सुरूच राहील, याकडे लक्ष दिले. किराणा वगळता कपडे, फर्निचर, भांडी यासह अन्य सर्व विभाग बंद ठेवले.

या सर्वांचे फलित म्हणजे सुपर मार्केट्समधून कोरोनाची लागण झाल्याचे एकही उदाहरण समोर आलेले नाही.

गेल्या तीन ते चार महिन्यांपासून काेराेनाची रुग्णसंख्या आटाेक्यात येत असल्याचे दिलासादायक चित्र हाेते. यामुळे टप्प्याने सर्वच उद्याेग व्यवसायांना साेशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्याच्या अटीवर परवानगी देण्यात आली. समाजजीवन पुन्हा एकदा रुळावर येत आहे. पण काेराेनाची धास्ती अद्याप लाेकांच्या मनातून गेलेली नाही. यामुळेच सुरुवातीला सक्तीचे वाटणारे साेशल डिस्टन्सिंग आज लाेकांना आवश्यक वाटत आहे. किरकाेळ दुकानदारांपासून सुपर मार्केट्सपर्यंत व्यावसायिकांनी याेजिलेल्या काेराेनाबाबतच्या उपाययाेजना लाेक सहजपणे स्वीकारत आहेत, त्यास सहकार्य करत आहेत. काेराेनाने दिलेला धडा आज उद्याेजक, व्यापारी वर्गासह ग्राहकांच्याही जगण्याचा वस्तुपाठ बनला आहे.

असे असताना गेल्या पंधरवड्यापासून काेराेनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून काेराेनाच्या दुसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. अनलॉकच्या टप्प्यातून पुन्हा लॉकडाऊनसारख्या आणीबाणीसदृश स्थितीमध्ये जात स्वत:ला पुन्हा एकदा काेंडून घेण्याची कुणाचीही इच्छा नाही. यामुळेच साेशल डिस्टन्सिंगबाबतची ही जागरुकता गरजेची ठरणार आहे.

———————————-

Web Title: Strengthening the fight against Kareena with ‘social distance’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.