मिरज पूर्वभागात राष्ट्रवादीची ताकद वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:31 IST2021-09-15T04:31:03+5:302021-09-15T04:31:03+5:30
ओळ : बेळंकी (ता. मिरज) येथे वसंतराव गायकवाड यांच्यासह प्रमुख मान्यवरांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. या वेळी पालकमंत्री जयंत पाटील ...

मिरज पूर्वभागात राष्ट्रवादीची ताकद वाढली
ओळ : बेळंकी (ता. मिरज) येथे वसंतराव गायकवाड यांच्यासह प्रमुख मान्यवरांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. या वेळी पालकमंत्री जयंत पाटील यांनी वसंतराव गायकवाड यांचा सत्कार केला.
लाेकमत न्युज नेटवर्क
लिंगनूर : वसंतराव गायकवाड यांचा मदनभाऊ गटातील प्रामाणिकपणा आम्ही पाहिला आहे. ते राष्ट्रवादीत आल्याने मिरज पूर्वभागात राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.
बेळंकी (ता. मिरज) येथील माजी मंत्री मदन पाटील गटाचे कट्टर कार्यकर्ते व दुय्यम बाजार आवार समितीचे सभापती वसंतराव गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवरांनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या वेळी बेळंकी ग्राम विकास सोसायटीने नव्याने बांधलेल्या यशवंत अण्णा कोरे व्यापारी संकुलाचे उद्घाटन पाटील यांच्याहस्ते झाले. या वेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, मोहनराव शिंदे सहकारी कारखान्याचे अध्यक्ष मनोज शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे, तालुकाध्यक्ष तानाजी दळवी, पंचायत समिती सदस्या सुवर्णा कोरे, सभापती दिनकर पाटील उपस्थित होते.
या वेळी जयंत पाटील म्हणाले की, मिरज पूर्वभागातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी, पूर्व भागातील शेती, पाणी आदी प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी पाठीशी उभी राहील. म्हैसाळ योजनेचे वीजबिल न भरल्यास योजना सुरू राहणार नाही. आवर्तनाचे १९ टक्के वीजबिल शेतकऱ्यांनी वेळेवर भरावे. बाळासाहेब होनमोरे यांच्या पुढाकाराने मिरज पूर्वभागात अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश करत आहेत. आम्ही त्यांना बळ देऊ.
या वेळी खंडेराव जगताप, काकासाहेब इंगवले, वास्कर शिंदे, प्रमोद इनामदार, जीवन पाटील आदी उपस्थित होते.
चाैकट
मदन पाटील गटास धक्का
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसंतराव गायकवाड यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने मदन पाटील गटास मोठा धक्का बसला आहे, पूर्व भागात माेठ्या राजकीय घडामोडी सुरू झाल्या आहेत.