शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
2
ब्रम्होस: पाकिस्तानचे ११ एअरबेस उगाच नाही भेदले...; भारताला माजी राष्ट्रपतींनी दिलेली 'भेट'
3
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल
4
Jyoti Malhotra :'या' एका गोष्टीमुळे ज्योती मल्होत्रावर तपास यंत्रणेला संशय आला; चौकशीत होणार खुलासा
5
"माझा नवरा पाकिस्तानचा हेर नाही, तो तर..."; आयएसआय एजंटना मदत करणाऱ्या शाहजादची पत्नी काय म्हणाली?
6
Shahana Fatima : नागपूरच्या लेकीची शिकागोत नेत्रदिपक कामगिरी; शहाना फातिमाने केली कमाल, मिळवलं मोठं यश
7
ज्योती मल्होत्रा प्रकरणानं चर्चा, एका गुप्तहेराला किती पैसे देतं पाकिस्तान?; डिटेल रिपोर्ट
8
दरमहा १० हजारांची बचत? म्युच्युअल फंडात कुठे आणि कशी करावी गुंतवणूक? फक्त 'ही' चूक करू नका
9
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के; पाकिस्तान सीमेजवळही धक्के जाणवले
10
संजय राऊतांनी लिहिलेले 'नरकातला स्वर्ग' पुस्तक वसंत मोरेंनी देवाऱ्यात ठेवलं, कारण...
11
IPL 2025: १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दाढी-मिशी? व्हायरल झालेल्या फोटोमागचं सत्य काय?
12
तरुणांसाठी 'सायलेंट किलर' ठरतोय 'हा' आजार; वेगाने होतोय प्रसार, दिसत नाहीत लक्षणं
13
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
14
भयंकर! सुनेने रील बनवताच सासरच्या मंडळींना राग अनावर; संतापलेल्या सासऱ्याने फोडलं डोकं
15
मराठी गायकाने नाकारली तुर्कीतील कॉन्सर्टची ऑफर; म्हणाला, "५० लाख देत होते पण..."
16
गुंतवणूकदारांसाठी लॉटरी! ५ वर्षात 'या' शेअरने दिला ४.९९ कोटी रुपये परतावा; अजूनही गुंतवणुकीची संधी?
17
ज्योतीची साथीदार, एकत्रच करत होत्या पाकिस्तान वाऱ्या; कोण आहे प्रियंका सेनापती?
18
Amit Thackeray: "युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा"; अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र
19
EPFO चा धमाका! तुमच्या PF आणि पेन्शनमध्ये मोठे बदल, जाणून घ्या ५ महत्त्वाचे अपडेट्स
20
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रावर भडकली टीव्ही अभिनेत्री, म्हणाली- "अशा लोकांना..."

दुतोंडी विचार थांबवा : कल्पनाराजे

By admin | Updated: January 21, 2015 23:56 IST

शिवेंद्रसिंहराजेंना टोला : कास उंची वाढविण्याचा प्रस्ताव प्रथम उदयनराजेंनीच मांडल्याचे ठणकावले

सातारा : ‘कासची उंची वाढविण्याची संकल्पना सर्वप्रथम खासदार उदयनराजे भोसले यांनी मांडली आहे. त्याबाबतचा प्राथमिक प्रस्ताव २००२ मध्ये पालिकेच्या पूर्ण सत्ता काळात पाठविला. काही लोक कास उंची वाढविण्याचे सर्व प्रयत्न आपणच करीत असल्याचे बेगडी तंत्र बैठका व टेबलमेड बातम्या पसरवून भासवत आहेत,’ असा टोला कल्पनाराजे भोसले यांनी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नाव न घेता लगावला.आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मंगळवारी जलसंपदा विभागात बैठक घेऊन कास धरणाची उंची तातडीने वाढवावी, अशा सूचना केल्या होत्या. तसेच कास धरणाची उंची वाढविण्यासंदर्भात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रयत्न केले असल्याचे प्रसारमाध्यमातून बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. यापार्श्वभूमीवर बुधवारी कल्पनाराजे भोसले यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे खरपूस टीका झोडली आहे.कल्पनाराजे म्हणाल्या, ‘कास धरणाची उंची वाढविण्याचे काम फक्त एका कोणा लोकप्रतिनिधीमार्फत होत असल्याचे भासविले जात आहे. वास्तविक, कास उंचीच्या प्रस्तावाला आवश्यक असणारी वनजमीन ताब्यात घेण्याच्या समस्यांचा विचार करता ही जटील समस्या खासदार उदयनराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळेच सोडवली गेली आहे. उदयनराजेंनी पाठपुरावा केला नसता तर अजून दहा वर्षे वनजमीन ताब्यात मिळाली नसती. कासची उंची वाढविण्याचा प्रस्ताव खासदार उदयनराजेंनी दिला. त्याला बालीशपणा म्हटला. कण्हेरची ग्रॅव्हिटीची बिनखर्चाची, कमी खर्चाची योजना उदयनराजेंनी मांडली. तुम्ही ती सत्तेच्या जोरावर बासनात गुंडाळून साखर कारखान्याला लाभ होणार, अत्यंत महागडी शाहापूर योजना सातारकरांवर लादली. आज शाहापूर योजनेच्या वीजबिलांचा प्रचंड भुर्दंड पालिकेवर पर्यायाने सातारकरांवर पडला आहे. कास बंदिस्त पाईपलाईनची संकल्पना सर्वप्रथम दिवंगत प्रतापसिंह महाराज यांनी नगराध्यक्ष असताना मांडली; पण ती योजना उदयनराजे भोसले हे कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व नंतर महसूल मंत्री असतानाच्या काळात उदयनराजेंनी मंजूर करून कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली. सातारकरांविषयी इतके प्रेम तुम्हाला असते, तर १९७५-७६ पासून उदयनराजे महसूल मंत्री होईपर्यंत म्हणजेच १९९७-९८ पर्यंत पूर्ण सत्ता आणि विविध मंत्रिपदे संबंधितांकडे असतानाही कासची बंदिस्त पाईपलाईन का होऊ शकली नाही, हे उघड गुपित सातारकरांना माहिती आहे,’ असाही टोला कल्पनाराजे भोसले यांनी शिवेंद्रसिंहराजेंचे नाव न घेता लगावला. (प्रतिनिधी)श्रेय कशाचे घेताय?कण्हेर उद्भव, कास बंदिस्त पाईपलाईन, केंद्र शासनाची घरकूल योजना, कासचा गाळ काढणे, कोंडवे हे आदर्श संसद ग्राम जाहीर केल्यावर येथील रस्त्यांची कामे या व अशा अनेक विषयांच्या माध्यमातून मी केले, आमक्याचे स्वप्न होते, अशा प्रकारच्या गोंडस वाक्यांचा आधार घेत श्रेय घेणाऱ्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्या कामाबाबत श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे.