मिरज-पंढरपूर मार्गावर रास्ता रोको
By Admin | Updated: June 18, 2014 01:25 IST2014-06-18T01:22:35+5:302014-06-18T01:25:28+5:30
रेंगाळलेल्या डांबरीकरणाच्या कामाला तातडीने सुरुवात करण्याच्या मागणीसाठी बंडखोर सेनेच्यावतीने मिरज-पंढरपूर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन

मिरज-पंढरपूर मार्गावर रास्ता रोको
मालगाव : तासगाव फाटा ते तानंग फाटा या रेंगाळलेल्या डांबरीकरणाच्या कामाला तातडीने सुरुवात करण्याच्या मागणीसाठी बंडखोर सेनेच्यावतीने मिरज-पंढरपूर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
तासगाव फाटा ते तानंग फाटा रस्त्याचे काम करण्याचे अधिकाऱ्यांनी आठ दिवसात कामास सुरुवात करण्याची हमी दिली होती. मात्र ती पाळण्यात न आल्याने रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी संजय पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन, रखडलेले डांबरीकरण पावसाळा संपताच पूर्ण केले जाईल, त्याचबरोबर दोनच दिवसात रस्त्याचे मुरुमीकरण व खडीकरण करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात बंडखोर सेनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर कांबळे, उपाध्यक्ष नीलेश मोहिते, शिवाजी पांढरे, प्रमोद कांबळे, अमर मोरे, सूरज मस्के, अविनाश कांबळे, सागर आवळे यांचा सहभाग होता. (वार्ताहर)