दिल्ली आंदोलनाला पाठिंब्यासाठी सांगली, इस्लामपुरात आज रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:49 IST2021-02-06T04:49:04+5:302021-02-06T04:49:04+5:30
ते म्हणाले, कृषी विधेयके रद्द करा, या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून दिल्ली येथे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची दखल ...

दिल्ली आंदोलनाला पाठिंब्यासाठी सांगली, इस्लामपुरात आज रास्ता रोको
ते म्हणाले, कृषी विधेयके रद्द करा, या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून दिल्ली येथे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची दखल घ्यायला केंद्र सरकार तयार नाही. उलट आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. सध्या आंदोलन ठिकाणाच्या बाहेर काटेरी कुंपण तयार करण्याचे काम सुरू आहे. रस्त्यावर खिळे मारण्यात आले आहेत. रस्ते खोदले आहेत. एकंदरीत आंदोलकांना शत्रू ठरवून त्यांच्याशी वागण्याचा प्रयत्न केंद्र सरकारचा सुरू आहे. त्यामुळे देशव्यापी चक्का जामची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून लक्ष्मी फाटा व इस्लामपूर येथे सकाळी दहा वाजता आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही खराडे यांनी केले आहे.
या आंदोलनात उमेश देशमुख, विकास मगदूम, डॉ. संजय पाटील, राजू कवठेकर, सतीश साखळकर, मुनीर मुल्ला, संजय बेले, पोपट मोरे, संदीप राजोबा, भागवत जाधव आदी उपस्थित राहणार आहेत.