शहरं
Join us  
Trending Stories
1
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
2
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
3
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
4
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
5
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... 
6
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
7
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
8
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
9
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
10
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
11
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
12
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
13
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
14
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
15
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
18
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
19
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
20
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार

पाणीप्रश्नी संघर्ष : कडेगावात  संतप्त शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 4:58 PM

कडेगाव तलावाचा टेंभू  योजनेच्या लाभक्षेत्रात समावेश करावा  तसेच टेंभूचे पाणी सोडून हा तलाव भरून घ्यावा. यासह विविध मागण्यासाठी कडेगाव येथील शेतकऱ्यांनी  रस्ता रोको आंदोलन केले. या विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्गावर तब्बल दोन तास वाहतूक ठप्प झाली होती.

ठळक मुद्देकडेगावात  संतप्त शेतकऱ्यांचे  रास्ता रोको आंदोलन पाणीप्रश्नी संघर्ष : विजापूर गुहागर महामार्गावर चक्का जाम

कडेगाव : कडेगाव तलावाचा टेंभू  योजनेच्या लाभक्षेत्रात समावेश करावा  तसेच टेंभूचे पाणी सोडून हा तलाव भरून घ्यावा. यासह विविध मागण्यासाठी कडेगाव येथील शेतकऱ्यांनी  रस्ता रोको आंदोलन केले. या विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्गावर तब्बल दोन तास वाहतूक ठप्प झाली होती.कडेगाव येथील सामाजिक कार्यकते डी.ऐस. देशमुख व श्रमिक मुक्ती दलाचे नेते मोहनराव यादव यांच्या नेतृत्वाखाली संतप्त शेतकऱ्यांनी चक्का जाम केल्याने टेंभू योजनेचे  सहाय्यक अभियंता नरेंद्र घार्गे यांनी आठ दिवसात कडेगाव तलावात पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्यात व अन्य मागण्या वरिष्ठापर्यंत पाठवण्यात येईल असे आश्वासन दिले आणि  आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.कडेगाव तालुक्यात चालूवर्षी पावसाचे प्रमाण कमी झाले आहे.पाण्याभावी खरीप वाया गेला आहे तर रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. कडेगाव शहरासह परिसरात तीव्र पाणी टंचाई भासू लागली आहे. पाणी नसल्याने उस व अन्य बागायती पिकेही वाळून चालली आहेत. टेंभू योजनेची  पाणीपट्टी शेतकऱ्यांच्या उसबिलातून साखर कारखाने वसूल करतात व योजनेकडे भारतात तरीही योजनेचे पाणी मात्र मिळत नाही.लाभक्षेत्रातील शेतजमिनीला टेंभू  योजनेचे पुरेसे  पाणी मिळावे तसेच सुरली कालव्यातून पूर्ण क्षमतेने पाणी सोडावे.शिवाजीनगर तलावाखालील कडेगाव शिवारातील शेतीसाठी पूर्ण क्षमतेने पाणी सोडावे. भरलेल्या पाणीपट्टीच्या पावत्या शेतकऱ्यांना मिळाव्या अशा मागण्या आंदोलकांनी केल्या .यावर  टेंभू योजनेचे साहाय्यक  घार्गे यांनी मागण्या पूर्ण करण्याचे  आश्वासन दिले यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.यावेळी सामाजिक कार्यकर्ते डी.एस. देशमुख, श्रमिकमुक्ती दलाचे नेते मोहनराव यादव, शेतकरी संघटनेचे नेते युनुस पटेल, महेंद्र करांडे , संजय तडसरे, हाजी फिरोज बागवान , दीपक न्यायनीत यांची भाषणे झाली. यावेळी सुनील पवार, सुनील गाढवे , प्रकाश शिंदे , सिराज पटेल , दीपक शेडगे, अनिल देसाई , भरत माळी , राजाराम माळी यांच्यासह शेतकरी मोठ्या संखेने शेतकरी उपस्थित होते. 

टॅग्स :Chakka jamचक्काजामSangliसांगली