बेताल वक्तव्ये बंद करा, अन्यथा न्यायालयात खेचू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:28 IST2021-04-20T04:28:26+5:302021-04-20T04:28:26+5:30

इस्लामपूर : इस्लामपूर नगरपालिकेचा ‘सँड स्टोन’ राष्ट्रवादीच्या कोणत्याही नगरसेवकाने पळविलेला नाही. विकास आघाडीचे नगरसेवक वैभव पवार यांनी बेताल वक्तव्ये ...

Stop making absurd statements, otherwise we will be dragged to court | बेताल वक्तव्ये बंद करा, अन्यथा न्यायालयात खेचू

बेताल वक्तव्ये बंद करा, अन्यथा न्यायालयात खेचू

इस्लामपूर : इस्लामपूर नगरपालिकेचा ‘सँड स्टोन’ राष्ट्रवादीच्या कोणत्याही नगरसेवकाने पळविलेला नाही. विकास आघाडीचे नगरसेवक वैभव पवार यांनी बेताल वक्तव्ये करून जनतेची दिशाभूल व राष्ट्रवादीची बदनामी करू नये, अन्यथा त्यांना न्यायालयात खेचू, असा इशारा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष, नगरसेवक शहाजी पाटील यांनी दिला.

पाटील म्हणाले, इस्लामपूर नगरपालिकेने खासगी कंत्राटदारास मध्य प्रदेशमधून सँड स्टोन आणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्याचे काम दिले होते. संबंधित कंत्राटदाराने हा सँड स्टोन मध्य प्रदेशवरून आणला होता. हे काम पूर्ण झाल्यानंतरही काही दगड शिल्लक होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तहसीलदार इमारतीच्या उद्घाटनास इस्लामपूरला आले होते. तेव्हा क्रेनच्या साहाय्याने हे दगड उचलून लोकनेते राजारामबापू पाटील नाट्यगृहाच्या पाठीमागे ठेवले आहेत. मग हा दगड पळविण्याचा विषय येतोच कुठे?

ते म्हणाले, शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण इस्लामपूर नगरपालिकेने केलेले आहे. हे काम कोणा एका व्यक्तीने अथवा पक्ष, आघाडीने केलेले नाही. पुतळा सुशोभीकरण कामात नेते, कार्यकर्ते व आंबेडकरी जनतेचे योगदान मोलाचे आहे. या कामासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनीही मोठा निधी दिला आहे. त्यामुळे कोणी स्वत:ची पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न करू नये.

Web Title: Stop making absurd statements, otherwise we will be dragged to court