शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
4
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
5
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
6
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
7
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
8
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
9
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
11
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
12
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
13
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
14
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
15
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
16
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
17
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
18
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
19
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
20
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’

चोरटी आयात थांबवा; चीनच्या बेदाण्याविरोधात सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचा मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 16:26 IST

शासकीय चुकीच्या धोरणाविरोधात शेतकऱ्यांची घोषणाबाजी

सांगली : नेपाळमार्गे बेकायदेशीररीत्या भारतात आयात होणाऱ्या चीनमधील निकृष्ट दर्जाच्या बेदाण्याने देशातील द्राक्ष उत्पादकांच्या आर्थिक हिताला गंभीर धोका निर्माण झाला आहे. चीनचा बेदाणा भारतात दाखल झाल्यापासून देशांतर्गत प्रतिकिलो २५ ते ३० टक्के बेदाण्याचे दर कमी झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. म्हणूनच केंद्र आणि राज्य शासनाने चीनच्या बेदाण्यावर बंदी घालून चोरट्या मार्गाने होणारी आयात थांबवावी, या प्रमुख मागणीसाठी जिल्ह्यातील द्राक्ष व बेदाणा उत्पादकांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून शासनाच्या धोरणाचा निषेध केला.महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाचे पुणे विभागाचे उपाध्यक्ष मारुती चव्हाण, जिल्हाध्यक्ष दत्ताजीराव पाटील, सचिव तुकाराम माळी, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे, माजी सभापती दिनकर पाटील, सर्जेराव पाटील, व्यापारी अशोक बाफना, भूपाल पाटील आणि इतर पदाधिकारी, शेतकऱ्यांनी एकत्र येऊन चीनच्या बेदाणा आयातीसह अन्य १३ मागण्यांसाठी मोर्चा काढला. सांगलीतील विश्रामबाग चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांसह व्यापारी, शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. शेतकऱ्यांच्या या मोर्चात हजारो उत्पादकांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. चीनमधून थेट नेपाळच्या ‘पूजा स्पायसेस अँड पॅकेजिंग’ कंपनीमार्फत भारतात आयात होणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या बेदाण्याविरुद्ध शेतकऱ्यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडत केंद्र सरकारकडे त्वरित कारवाईची मागणी केली.द्राक्ष बागायतदार संघाचे मारुती चव्हाण, दत्ताजीराव पाटील म्हणाले, यापूर्वीदेखील चीनमधील बेदाणा बेकायदेशीरपणे नेपाळ, आसाम, उत्तर प्रदेश व बिहारमार्गे भारतात येऊन बाजारपेठेत विकल्यामुळे देशातील बेदाणा विक्रीवर त्याचा मोठा परिणाम झाला होता. आयात शुल्क व कर चुकवून होणाऱ्या या व्यवहारांमुळे राज्य व केंद्र सरकारचा करोडाे रुपयांचा महसूल बुडत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

केंद्र, राज्य शासनाकडे शेतकऱ्यांची मागणी

  • चीनमधील बेदाणा बेकायदेशीर आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांची मालमत्ता जप्त करा.
  • चीनमधून होणारी सर्व बेदाणा आयात ताबडतोब थांबवावी.
  • आयातीवर ३०० रुपये बेस रेट व १०० टक्के आयात शुल्क लावावे.
  • बेदाण्याची डीएनए चाचणी अनिवार्य करावी, ज्यामुळे मूळ देशाचा शोध लागेल.
  • महाराष्ट्रात शीतगृहाच्या भाड्यावर १८ टक्के जीएसटी रद्द करा.
  • बेदाण्याच्या उद्योगासाठी 'रायझन बोर्ड' स्थापन करण्याची गरज
  • द्राक्ष निर्यातीसाठी आवश्यक असलेल्या रिसिड्यू टेस्टचा खर्च शासनाने करावा.
  • सांगलीमध्ये निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी इनलँड कंटेनर डेपो उभारावे.
  • निर्यात करणाऱ्या कंपन्यांसाठी पॅकिंग मटेरियलसाठी अनुदान सुरू करा.
  • अपेडाप्रमाणे संस्थांनी लाइव्ह कंटेनर अपडेट सिस्टम तयार करावी.
  • शेतकऱ्यांची आणि शेतमालाची सुरक्षा करण्यासाठी कडक कायदे करावेत.
  • आरोग्यास हानिकारक तणनाशक '२,४-डी'वर महाराष्ट्रात बंदी घालावी.