शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

..अखेर दादर-हुबळी एक्स्प्रेसला सांगलीतील किर्लोस्करवाडीत थांबा, प्रवासी संघटनांच्या प्रयत्नांना यश

By अविनाश कोळी | Updated: July 4, 2024 16:10 IST

मिरज : रेल्वेने ७ जुलैपासून प्रायोगिक तत्त्वावर दादर-हुबळी-दादर एक्स्प्रेसला किर्लोस्करवाडी स्थानकात थांबा दिला आहे. ७ जुलै रोजी हुबळी येथून ...

मिरज : रेल्वेने ७ जुलैपासून प्रायोगिक तत्त्वावर दादर-हुबळी-दादर एक्स्प्रेसला किर्लोस्करवाडी स्थानकात थांबा दिला आहे. ७ जुलै रोजी हुबळी येथून सुटणारी दादर-हुबळी एक्स्प्रेस रात्री ९:५८ वाजता किर्लोस्करवाडी स्थानकात पोहोचेल. रात्री १० वाजता सुटेल. त्याचदिवशी दादर येथून सुटणारी दादर-हुबळी एक्स्प्रेस किर्लोस्करवाडी स्थानकात ४:१८ वाजता पोहोचेल. ४:२० वाजता सुटेल. प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत यांनी केले आहे.रेल्वे बोर्डाने १४ मार्च रोजी दादर-हुबळी एक्स्प्रेसला किर्लाेस्करवाडीत थांबा मंजूर केला होता. मंजुरीचे अधिकृत पत्र येऊनही मध्य रेल्वेकडून थांबा लवकर न दिल्याने प्रवासी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. किर्लोस्करवाडी व सांगली येथील प्रवासी संघटनांनी चार महिन्यांपासून वेळोवेळी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून दादर-हुबळी एक्स्प्रेसचा किर्लोस्करवाडी थांबा सुरू करण्याची विनंती केली; पण प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सहा दिवसांत थांबा सुरू झाला नाही, आंदोलन करण्यात येईल, असा इशारा किर्लोस्करवाडी रेल्वे प्रवासी संघटनेचे चंद्रकांत जाधव, राजाभाऊ माने, जीवन नार्वेकर, डाॅ. चंद्रशेखर माने, अजित लेंगरेकर यांनी दिला होता. अखेर प्रवासी संघटनांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून येत्या ७ जुलैला किर्लोस्करवाडीच्या सेवेत ही गाडी रुजू होणार आहे.

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वे