सांगलीत एसटीवर दगडफेक

By Admin | Updated: June 3, 2014 01:23 IST2014-06-03T01:22:30+5:302014-06-03T01:23:54+5:30

सुरूच बंदोबस्तात वाढ : संशयितांवर ‘वॉच’

Stonewall on Sangli ST | सांगलीत एसटीवर दगडफेक

सांगलीत एसटीवर दगडफेक

सांगली : राष्टÑपुरुषांची आक्षेपार्ह छायाचित्रे फेसबुकवर प्रसिद्ध केल्याने शहरात उमटलेले पडसाद अद्याप कायम असून, समाजकंटकांकडून एसटी बसेसना टार्गेट केले जात आहे. काल (रविवार) रात्री उशिरा आयर्विन पुलावर एसटीवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे पुन्हा शहरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. दापोली-मिरज ही एसटी बस (क्र. एमएच. ०७. सी. ७३३९) आयर्विन पुलावरुन सांगलीत येत होती. त्यावेळी दोन ते तीन संशयितांनी या बसवर दगडफेक केली. या घटनेनंतर चालक अमजत खाजा चौस (रा. मिरज) यांनी बस थांबविली. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस दाखल झाले. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात बस मुख्य बसस्थानकात आणण्यात आली. दगडफेकीत बसचे पाच ते सात हजाराचे नुकसान झाले आहे. याबाबत चौस यांनी फिर्याद दाखल केली आहे. शहरासह जिल्ह्यातही बसेसना टार्गेट करुन दगडफेकीच्या घटना घडत असल्याने जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी पोलिसांना दक्षतेचे आदेश दिले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Stonewall on Sangli ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.