शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: 'रिल्स'च्या नादात मिरजेत वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक, तीन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 15:36 IST

मिरज (जि. सांगली ) : रिल्स बनवण्याच्या नादात पुणे-हुबळी वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक करून काचा फोडणाऱ्या तिघा अल्पवयीन मुलांना ...

मिरज (जि. सांगली) : रिल्स बनवण्याच्या नादात पुणे-हुबळी वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक करून काचा फोडणाऱ्या तिघा अल्पवयीन मुलांना मिरजेतरेल्वे सुरक्षा दलाने ताब्यात घेतले. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुरुवारी पुण्यातून हुबळीला जाणारी वंदे भारत एक्स्प्रेस मिरजेतून सुटल्यानंतर आऊटर सिग्नल बाहेर गाडीवर दगडफेक झाल्याने ‘सी वन’ बोगीच्या खिडकीची काच फुटली. गाडीतील रेल्वे कर्मचाऱ्यांनी याबाबत हुबळी रेल्वे नियंत्रण कक्षाला माहिती दिली. वंदे भारतच्या बोगीवर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मिरजेत तीन अल्पवयीन मुले रेल्वे मार्गालगत बसलेली असून, त्यांनी गाडीवर दगडफेक केल्याचे दिसले. हुबळी नियंत्रण कक्षाने हे सीसीटीव्ही फुटेज मिरज रेल्वे सुरक्षा दलाकडे पाठवले. धावत्या रेल्वेतील कॅमेऱ्यातून चित्रित झालेले दगडफेकीचे ठिकाण मिरजेतील म्हैसाळ रोड परिसरात असल्याचे दिसून आले. मात्र, दगडफेक करणाऱ्या मुलांचे चेहरे ओळखता येत नव्हते. रेल्वे सुरक्षा दलाने म्हैसाळ रोड परिसरात रेल्वे मार्गालगत असलेल्या वसाहतींत शोध घेऊन दगडफेक करणाऱ्या मुलांना शोधून काढले.तिघेही अल्पवयीन असून, मोबाईलवर रिल्स बनवण्यासाठी ते रेल्वे मार्गावर गेले होते. यावेळी आलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसवर गंमत म्हणून दगडफेक केल्याची त्यांनी कबुली दिली. याप्रकरणी मिरज रेल्वे सुरक्षा दलाने तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.